Bell Bottom : अक्षय कुमारच्या ‘बेल बाॅटम’ सिनेमाकडे प्रेक्षकांची पाठ

अक्षय कुमारने प्रेक्षकांना गंडवलंय! म्हणून 'बेल बाॅटम' कमाईच्या आकड्यात घसरला
अक्षय कुमारने प्रेक्षकांना गंडवलंय! म्हणून 'बेल बाॅटम' कमाईच्या आकड्यात घसरला

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाॅलिवुडचा ब्रॅन्ड समजल्या जाणाऱ्या अक्षय कुमारच्या 'बेल बाॅटम' (Bell Bottom) चित्रपट या आठवड्यात १५ कोटीदेखील कमवू शकलेला नाही. रविवार सुट्टी दिवस, त्यात रक्षाबंधनाचा सण या फायदा चित्रपटाला होईल, अशी अपेक्षा चित्रपट वितरकांनी लावला होता. मात्र, त्यांच्या वाट्याला अपेक्षाभंग आला आहे.

अक्षय कुमारच्या बेलबाॅटम (Bell Bottom) या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळालेला नकारात्मक पाठिंबा आगामी चित्रपटांवर परिणाम करणारा ठरेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. अक्षय कुमारचे आणखी ८ चित्रपट येण्याच्या टप्प्यावर आहेत. मात्र, बेटबाॅटम चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहता आगामी चित्रपटांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सध्या अक्षय कुमार ब्रिटिनमध्ये रकूल प्रीत सिंह आणि चंद्रचूड सिंह यांच्यासहीत बेलबाॅटमचे निर्माता वाशू भगनानी यांचा नवा चित्रपट 'सिंड्रेला' याची शुटिंग करण्यात व्यस्त आहे. अक्षयचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट पूर्ण झाला असूनही मागील दीड वर्षांपासून वेटिंगवर आहे.

इतकंत नाही, तर यशराज फिल्मची 'पृथ्वीराज', साजिद नाडियावाला यांची 'बच्चन पांडे' आणि आनंद एल राय यांची 'अतरंगी रे', या चित्रपटांचीही शुटिंग पूर्ण झालेली आहे. 'रामसेतू', 'रक्षाबंधन' आणि 'ओएमजी-२' यांसारख्या चित्रपटांचंही शुटिंग सुरू आहे. या सर्व चित्रपटांचा हिशेब काढला तर, अक्षय कुमारवर एकूण १५०० कोटी रुपये लावण्यात आलेले आहेत.

एका काल्पनिक कथेला सत्य कथा म्हणून प्रचार केल्यानंतर 'बेटबाॅटम' चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. त्यावर प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया सर्वात जास्त आल्या. रविवार आणि रक्षाबंधन, असा दिवस असूनही बेलबाॅटम या चित्रपटाला ४.८५ करोड रुपयांच्या पलिकडे आकडा गाठता आला नाही.

पहा व्हिडीओ : सोनपरी मृणाल कुलकर्णीशी खास गप्पा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news