बेळगाव : अंकली येथील जवान अशोक मुंदडा यांना आसाममध्ये वीरमरण

बेळगाव : अंकली येथील जवानाचा आसाममध्ये वीज पडून मृत्यू
बेळगाव : अंकली येथील जवानाचा आसाममध्ये वीज पडून मृत्यू

अंकली, पुढारी वृत्तसेवा : आसाम येथे सीमा सुरक्षा दलात  (बीएसएफ) सेवा बजावत असताना वीज काेसळून शिरूर येथील अशोक मुंदडा (वय ४१) यांना वीरमरण आले. ही घटना शनिवारी (दि. ४ जून) रात्री घडली.

अशोक मुंदडा हे बीएसएफच्या बटालियन तेरामध्ये कार्यरत होते. आसाम सीमेवर सेवा बजावत असताना अंगावर वीज काेसळल्‍याने त्‍यांचा मृत्‍यू झाला. त्‍यांच्‍या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. उद्या सायंकाळपर्यंत त्यांचे पार्थिव स्वग्रामला येण्याची शक्यता आहे. अशोक मुंदडा यांना वीरमरण प्राप्त झाल्याचे समजताच त्यांच्या जन्मगावी शिरूर जिल्हा बागलकोट गावावर शाेककळा पसरली.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news