Victoria Azarenka : युक्रेनमधील परिस्थिती पाहून मी उद्ध्वस्त झाले; बेलारूसची टेनिसपटू अझारेंका हिचे भावूक ट्विट

Victoria Azarenka : युक्रेनमधील परिस्थिती पाहून मी उद्ध्वस्त झाले; बेलारूसची टेनिसपटू अझारेंका हिचे भावूक ट्विट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

रशिया- युक्रेनमधील संघर्षात मोठी जीवितहानी झाली आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील झालेली परिस्थिती पाहून माजी जागतिक नंबर वन बेलारूसची टेनिसपटू व्हिक्टोरिया अझारेंका (Victoria Azarenka) व्यथित झाली आहे. युक्रेनमधील परिस्थितीमुळे मी उद्ध्वस्त झाली आहे, असे अझारेंका हिने ट्विट करत म्हटले आहे. युद्ध थांबवून शांततेचे आवाहन तिने केले आहे.

"युद्धातील हिंसेमुळे अनेक निष्पाप लोक प्रभावित झाले आहेत. हे खूप हृदयद्रावक आहे," असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे. नेहमीच युक्रेन आणि बेलारूस या दोन्ही देशांतील नागरिकांचे संबंध मैत्रीपूर्ण राहिले आहेत. ते एकमेकांना मदतीसाठी धावून जात असल्याचे आपण पाहिले आहे. पण आता एकमेकांना पाठिंबा आणि सहानुभूती देण्याऐवजी सध्यस्थितीला त्यांच्यात दुरावा दिसत आहे, अशी खंत अझारेंकाने (Victoria Azarenka) व्यक्त केली आहे.

रशियन हल्ल्यांमध्ये युक्रेनमधील कीव्ह, खार्कोव्ह, बुका, मारियुपोल आणि जितोमीर या शहरांवर रशियाने बॉम्ब हल्ले केले आहेत. या शहरांतील अनेक परिसर पुरते उद्ध्वस्त झाले आहेत. रस्त्यांवर पडलेली प्रेते उचलणारेही कुणी नाही. पाच लाखांहून अधिक लोकांनी युक्रेनमधून स्थलांतर केले आहे. कीव्ह, लीव्हसह अन्य शहरांतील रेल्वेस्थानकांवर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. कीव्हनजीक असलेल्या बुका या शहरात रशियन सैनिकांनी कहर केला. युक्रेनियन लष्करानेही प्रतिहल्ले केले. रशियन रणगाडे या हल्ल्याचे लक्ष्य होते. शहरातील रस्त्यांवर सर्वत्र रणगाड्यांचे भाग इतस्तत: विखुरलेले आहेत. युक्रेनियन सैनिकांसह स्थानिक लोकही रशियन सैनिकांवर गनिमी काव्याने हल्ले करीत आहेत. रशियन सैनिकांना त्यामुळे पुढे सरकणे अवघड झाले आहे.

एकट्या खार्कोव्हवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात २१ जण मृत्युमुखी पडले आहेत, तर ११२ जखमी झाले. भारतीय विद्यार्थ्यांनी खार्कोव्ह सोडावे, अशी आणीबाणीची 'अ‍ॅडव्हायझरी' बुधवारी भारतीय दूतावासाने जारी करताच खार्कोव्हवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला झाला. खार्कोव्हमध्ये अजूनही भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत. अनेक जण रेल्वेस्थानकांवर प्रतीक्षा करत आहेत, तर अनेक जण विशेषत: विद्यार्थी पायीच खार्कोव्ह सोडून निघाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news