‘ड्रॅगन’ची सटकली..! चीनने डॉक्‍युमेंटरीतून तैवानला दिली हवाई हल्‍ल्‍याची धमकी

‘ड्रॅगन’ची सटकली..! चीनने डॉक्‍युमेंटरीतून तैवानला दिली हवाई हल्‍ल्‍याची धमकी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चीन आणि तैवानमधील तणावात आणखी भर पडली आहे. चीनच्‍या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ने आपल्‍या ९६ व्‍या वर्धापनदिनानिमित्त 'झू मेंग' डॉक्युमेंटरी (माहितीपट) प्रदर्शित केली. या माध्‍यमातून तैवानवर मोठा हवाई हल्‍ला करण्‍याची धमकीच दिली आहे. जाणून घेवूया चीन आणि तैवानमधील ( China-Taiwan ) वाढत्‍या संघर्षाविषयी…

अमेरिकेने जाहीर केले तैवानसाठी लष्‍करी पॅकेज

नुकतेच अमेरिकेने तैवानसाठी लष्‍करी पॅकेज जाहीर केले आहे. यामुळे चीन बिथरला आहे. राजधानी बीजिंगमधून तैवानविरोधात संतप्‍त प्रतिक्रिया उमटत आहेत. तैवान हा आपलाच भाग आहे, असा दावा चीन करत आला आहे. तसेच मागील काही महिने सातत्‍याने ड्रोन आणि लढाऊ विमाने तैवानमध्ये घुसवत चीनने आगळीक कायम ठेवली आहे. एप्रिल २०२३मध्‍ये चीनने तैवानभोवतीच सैन्‍य सराव करत पुन्‍हा एकदा तैवानमध्‍ये दहशत माजविण्‍याचा प्रयत्‍न केला होता. आता अमेरिकेने तैवानसाठी लष्‍करी मदतीचे पॅकेज जाहीर केल्‍याने चीनने पुन्‍हा एकदा आकांडतांडव करण्‍यास सुरुवात केली आहे.

 China-Taiwan : 'झू मेंग' डॉक्युमेंटरीमध्‍ये काय म्‍हटलं आहे?

यासंदर्भात WION ने दिलेल्‍या वृत्तात्त म्‍हटलं आहे की,  चीनच्‍या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)ने आपल्‍या ९६ व्या वर्धापनदिनानिमित्त 'झू मेंग'डॉक्युमेंटरी प्रदर्शित केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'झू मेंग' या माहितीपटाचे आठ भाग आहेत. ज्याचा पहिला भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये चिनी हवाई दल गरज पडेल तिथे जबरदस्त हल्ला करण्यास सज्ज असल्याचे दाखवले आहे. गरज पडल्यास देशासाठी आम्‍ही प्राणांची आहुती देवू, अशी शपथ घेताना 'पीएलए'चे जवान दाखवले आहेत.

चीनकडून धमक्‍यांचे सत्र सुरुच

मागील काही महिने चीनने तैवानला वारंवार धमक्‍या देणे सुरुच ठेवले आहे. अलीकडेच युद्धाभ्यासात चीनने अप्रत्यक्षपणे तैवानला घेरण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर विमानतळ बंद करण्याचा प्रयत्न केला. दारूगोळा वाहून नेणाऱ्या विमानांनी तैवानजवळ हल्ला करण्याचा सराव केला होता. या सरावात त्याची शेडोंग विमानवाहू नौकाही सहभागी झाली होती.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news