बीड : मांजरा धरण ९० टक्के भरले; नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बीड : मांजरा धरण ९० टक्के भरले; नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Published on
Updated on

केज; पुढारी वृत्तसेवा : परतीच्या पावसाचा जोर मागील काही दिवसांपासून कायम असल्याने मांजरा धरण ९० टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात सातत्याने पाऊस चालूच असल्याने आजमितीला चोवीस ते छत्तीस तासात धरण भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागण्याची शक्यता गृहीत धरून बीड, लातूर व उस्मानाबाद (धाराशिव) येथील जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आल्याची माहिती मांजरा धरणाचे अभियंता सुरज निकम यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना दिली.

बीड, लातूर, उस्मानाबादसह (धाराशिव) अनेक गावांची तहान भागवणारे मांजरा धरण अखेर 90 टक्क्यांहून आधिक भरले आहे. त्यामुळे पाण्याची आवक पाहता मांजरा धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मांजरा धरणाचे शाखाधिकारी यांनी कळंब, केज, अंबाजोगाई, लातूर, रेणापूर, निलंगा येथील तहसिलदार यांना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याची विनंती केली आहे.

मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे तसेच धरणात येणारी जास्तीची आवक पाहता मांजरा धरणातून द्वार परिचालन आरखड्यानुसार धरण 100 टक्के व पाणी पातळी 642.37 मी. झाल्यावर येणाऱ्या पाण्याची आवक पाहता मांजरा धरणाचे द्वार उघडून पाणी नदीपात्रात सोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तसेच येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात कमी अधिक वाढ करण्यात येऊ शकते, अशी माहिती शाखाधिकारी, पूर नियंत्रण कक्ष, मांजरा प्रकल्प धनेगाव यांनी दिली आहे.

दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने व मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता नदीकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांनी दिली.

मांजरा प्रकल्प धनेगाव पाणी पातळी शुक्रवार (दि. १४) वेळ :- सकाळी 12:00 वाजता.
पाणीपातळी :- 642.02 मी./ 642.37 मी.
एकूण पाणीसाठा दलघमी = 207.128/224.093
जिवंत साठा दलघमी =169.998/176.963
जिवंत पाणीसाठा टक्केवारी : 92%
धरणातील आवक : 122.91 घनमीटर/सेकंद

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news