सातारा: पणन विभागाचे सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदीत सापडला | पुढारी

सातारा: पणन विभागाचे सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदीत सापडला

सातारा: पुढारी वृत्तसेवा: दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले पणन विभागाचे सहसंचालक शशिकांत घोरपडे यांच्या यांनी नीरा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत असतानाच दोन दिवसानंतर आज (दि.१४) त्यांचा मृतदेह रेस्क्यू टीमला सापडला. दरम्यान या संदर्भात, त्यांच्या कुटुंबीयांनी शिरवळ पोलीस ठाण्यात घोरपडे बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे. काल सायंकाळपासून रेस्क्यू टीम च्या मदतीने नीरा नदी पात्रात त्यांचा शोध सुरू होता आज अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

घोरपडे यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे सातारा महामार्गावर सारोळे येथील पुलावरून उडी मारली असल्याचा संशय होता. पुण्याहून सातारा कडे जात असताना शिरोळ्याच्या पुलाजवळ गाडी पार्क करून घोरपडे नीरा नदीच्या पुलावर जात असल्याचा सीसीटीव्ही समोर आला. त्यानंतर मात्र घोरपडे यांचा काही शोध लागला नाही. cctv फुटेजच्या आधारे व त्यांची गाडी पूलाजवळ आढळल्याने सारोळे येथे नीरा नदीत उडी मारली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवल्यानंतर त्या आधारावर रेस्क्यू टीमच्या मदतीने नीरा नदीत शोधकार्य सुरू करण्यात आले होते.  शशिकांत घोरपडे हे राज्याच्या पणन विभागात सहसंचालक म्हणून काम करीत आहेत. कुटुंबीयांकडून शिरवळ पोलीस स्टेशनंमध्ये मिसिंग तक्रार देण्यात आली आहे. बुधवार संध्याकाळपासून घोरपडे बेपत्ता आहेत. पुण्यातील विभागीय कार्यालयात सहसंचालक पदावर ते काम करत आहेत.

Back to top button