बीड : केज तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू

शेतकऱ्याचा मृत्‍यू
शेतकऱ्याचा मृत्‍यू

बीड : पुढारी वृत्‍तसेवा; केज तालुक्यातील गप्पेवाडी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. गप्पेवाडी (ता. केज) येथील ज्ञानोबा निवृत्ती केदार वय (६५ वर्षे) असे त्‍यांचे नाव आहे. या विषयी अधिक माहिती अशी की, ज्ञानोबा हे रविवारी सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास शेतातून जनावरे घेऊन घराकडे घेऊन येत होते. यावेळी विजेच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. त्यावेळी अचानक ज्ञानोबा निवृत्ती केदार यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी त्यांचे नातेवाईक श्रीमंत विठ्ठल केदार यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक बाळराजे सोनवणे हे करीत आहेत.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news