बीड : केज-कळंब रोडवर कारला अपघात; एअर बॅगमुळे वाचले चालकाचे प्राण

कारला अपघात
कारला अपघात

केज ; पुढारी वृत्‍तसेवा केज-कळंब रोडवर साळेगांव जवळील एका पुलावर ब्रिझा गाडीचा पुलाला धडकून भीषण अपघात झाला. मात्र सुदैवाने यामध्ये प्राणहानी झालेली नाही.

या बाबतची अधिक माहिती अशी की, दि. २२ मध्यरात्री १२:४५ वाजण्याच्या सुमारास तुकाराम देशमुख सहशिक्षक हे कळंब येथील लग्न आटोपून त्यांच्या ब्रिझा गाडी क्र. (एम एच१४/जे एक्स ११०३) ने केजकडे येत होते. ते साळेगांव जवळील पारखे यांच्या शेताजवळ आले असताना समोरून येणाऱ्या एका अवजड वाहनाने त्यांना कट दिल्याने वाहनावरील त्यांचे नियंत्रण सुटून पुलाला गाडी धडकली. त्यात गाडीचे समोरील टायर फुटून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र चालक तुकाराम देशमुख यांनी सीटबेल्ट बांधलेला असल्याने गाडीतील सुरक्षा रक्षक यंत्रणा व जीव रक्षक प्रणाली कार्यान्वित होऊन दोन्ही एअर बॅग्ज ओपन झाल्या. त्यामुळे जीवित हानी टळली. मात्र चालक देशमूख यांना मुका मार लागला, यामध्ये गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.

पोलिसांची तत्परता :- अपघाताची माहिती पोलीसांना मिळताच केज आणि युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या रात्र गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक कादरी, हेडकॉन्स्टेबल सय्यद चाँद, पोलीस नाईक बाळासाहेब घोरपडे व काळे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. या अपघाताची माहिती मिळताच गावकरी मदतीला धावले.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news