बीड : अशोक शेजुळ हल्ला प्रकरण : आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह पत्नी मंगल सोळंके यांच्यावर गुन्हा दाखल

आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर गुन्हा दाखल
आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर गुन्हा दाखल

बीड : पुढारी वृत्‍तसेवा माजलगाव जि.बीड येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक शेजुळ यांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या संस्थेतील भ्रष्टाचारा प्रकरणी तक्रार केली होती. त्‍यामुळेच आमदार प्रकाश सोळंके यांनी त्‍यांच्या गुंडाकरवी आपल्‍यावर हल्‍ला केल्‍याची तक्रार शेजुळ यांनी पोलिस स्‍टेशन मध्ये केली होती. या तक्रारीवरून माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके त्‍यांची पत्नी मंगल सोळंके, रामेश्वर टवानी यांच्यासह अन्य सहा जनांवर गुन्हा दाखल झाला आहे.

माजलगाव येथील आमदार प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात असलेल्या सूतगिरणीत रूपांतरित केलेल्या माजलगाव वस्त्रोद्योग औद्योगिक संस्थेत झालेल्या करोडोच्या गैरव्यवहाराची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अशोक शेजुळ यांनी मागील महिन्यात शासनाच्या विविध विभागाकडे दाखल केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने काल (मंगळवार) सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात सहा लोकांनी अशोक शेजुळ यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. यामध्ये त्यांचे दोन्ही पाय व हात फॅक्चर झाले.

या हल्ल्या प्रकरणी आमदार प्रकाश सोळंके यांचा हात असल्याचा आरोप अशोक शेजुळ यांनी केला होता. त्यानुसार रात्री उशिरा अशोक शेजुळ यांच्या तक्रारीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आमदार प्रकाश सोळंके व त्यांची पत्नी मंगल प्रकाश सोळंके यांच्यासह रामेश्वर तवानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी दिली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news