केज : पुढारी वृत्तसेवा : केज-बीड रस्त्यावरील मस्साजोग जवळील पुलावरून ट्रॅव्हल्स कोसळली. ही बस आज (दि. ३१) पहाटे पुण्याहून नांदेडकडे जात होती. या अपघातात चार प्रवाशी जखमी झाले आहेत. या बाबतची माहिती अशी की, बुधवारी पहाटे ५ च्या दरम्यान पुण्याहून नांदेकडे जाणारी ओम साईराम ट्रॅव्हल्स क्र. (एम एच- ४०/एन-३६६१) केज – बीड रस्त्यावरील मस्साजोगजवळील पुलावरून खाली कोसळली. या अपघातात प्रवास करीत असलेल्या जयश्री जोंधळे, कान्होपात्रा करपेवाड, सीताबाई माळी आणि उषा रानेवाड हे ४ प्रवाशी जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार त्रिंबक सोपने, घोलप, महावीर सोनवणे, विलास शेटे यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी मदत केली.
हेही वाचलंत का ?