नाशिक : अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी-केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड | पुढारी

नाशिक : अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी-केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सध्या देशभरात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असले तरी, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या मते अमेरिका, चीन या देशांच्या तुलनेत भारतातील महागाई कमी आहे. त्यांच्या मते, कोरोनानंतर आपली अर्थव्यवस्था सुधारत आहे. देशात महागाई आहे, मात्र जगाच्या तुलनेत महागाई कमी आहे. शिवाय अमेरिका, चीन यांच्या महागाईदरापेक्षा देशातील महागाई दर कमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकमध्ये अखिल भारतीय महानुभाव संमेलनाच्या समारोपासाठी आलेले ना. डॉ. कराड भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी त्यांनी भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीदेखील घेतल्या.

यावेळी देशातील महागाईवर विचारले असता त्यांनी जगाच्या तुलनेत भारतात महागाई कमी असल्याचे स्पष्ट केले. ग्लोबल रिसेशनचे चिन्ह नाहीत, जे रिसेशन आले आहे ते कोरोनामुळे आले असून, आता ते दूर होत आहेत. जीसटी वाढतो याचाच अर्थ महागाई कमी असून, अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे. दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी दोनच दिवसांपूर्वी याबाबत राज्यसभा लोकसभेत निवेदन केले आहे. तसेच सुट्या पोह्यांवर जीएसटी नसून तो ब्रँडवर आहे. पॅकेज करून विकले तर जीएसटी लागणारच, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा :

Back to top button