BBMarathi : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणार सेलिब्रेशन!

BBMarathi : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणार सेलिब्रेशन!
Published on
Updated on

आज बिग बॉस मराठी रहिवाशी संघातील सदस्यांना मिळणार आहे-खास सरप्राईझ. बिग बॉस मराठीच्या (BBMarathi) घरामध्ये असणार आहे खास सेलिब्रेशन. घरातील सदस्य सुंदर तयार झाले आहेत. त्यामुळे धम्माल मस्ती होणार आहे. कारणसुध्दा तसेच आहे "नवरात्री" आज दसऱ्याच्या दिवशी बिग बॉस सदस्यांचा हा दिवस खास बनवणार आहेत. (BBMarathi)

वाद विवाद, भांडण, घरात पडलेले गट सगळं विसरून बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य एकत्र येऊन या सेलिब्रेशनचा भाग होणार आहेत. आईचा जोगवा मागेन या गाण्यावर महिला सदस्य अप्रतिम नृत्यदेखील सादर करणार आहेत.

अक्षया अय्यर आणि सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाचा स्पर्धक विश्वजित बोरवणकर हे त्यांच्या सुरेल आवाजात एकसे बडकर एक गाणी सादर करणार आहेत. सूर नवा ध्यास या कार्यक्रमाचे गायक आहेत. सर्व सदस्य मोठ्या उत्साहात सेलिब्रेट करताना दिसणार आहेत.

तेव्हा नक्की बघा. बिग बॉस मराठी सीझन तिसराच दोन तासाचा विशेष भाग आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news