बँक फोडण्याचा डाव फसला; भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याचा प्रयत्न

बँक फोडण्याचा डाव फसला; भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याचा प्रयत्न

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शेजारील ऑफिसच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला. पहाटेच्या सुमारास डांगे चौक येथील फेड बँकेत हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगे चौक येथील मयुरेश्वर मंदिराजवळ 'फेड' बँक आहे. बँकेच्या शेजारी अ‍ॅड. झोळ यांचे ऑफिस आहे.

दरम्यान, रविवारी (दि. ९) पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी शटर उचकटून अ‍ॅड. झोळ यांच्या दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून चोरटे बँकेत घुसण्याचा प्रयत्न करत असताना बाजूच्या एका कामगाराने आपल्या मालकाला फोनवर याबाबत माहिती दिली. मालकाने डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना कळविले. त्यानुसार, घटनास्थळी गस्तीवरील मार्शल दाखल झाली.

पोलिस आल्याची चाहूल लागताच चोरट्यांनी बाजूच्या पत्र्यावर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका पोलीसाने त्यांचा पाठलाग करीत पत्र्यावर उडी मारून एका चोरट्याला ताब्यात घेतले. यामध्ये पोलिस कर्मचाऱ्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचा फौजफाटा डांगे चौक परिसरात दाखल झाला आहे. वाकड पोलिसांनी संशयित आरोपी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news