Bangladesh vs India 3rd ODI : बांगलादेशचा डाव १८२ धावांत गुंडाळला : भारताचा २२७ धावांनी विक्रमी विजय

Bangladesh vs India 3rd ODI : बांगलादेशचा डाव १८२ धावांत गुंडाळला : भारताचा २२७ धावांनी विक्रमी विजय
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा २२७ धावांनी पराभव केला आहे. उमरान मलिकने बांगलादेशच्या डावातील शेवटची विकेट घेतली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकात ८ गडी गमावून ४०९ धावांचा डोंगर रचला होता. परंतु या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशी संघ ३४ षटकात केवळ १८२ धावा करू शकला आणि सामना गमावला. भारताकडून शार्दुल ठाकूरने ३, तर अक्षर पटेल आणि उमरान मलिकने २-२ विकेट घेतल्या. बांगलादेशने पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच खिशात घातली.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने ४०९ धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. खराब सुरूवातीनंतर कोणत्याही फलंदाजाला संघाचा डाव सावरता आला नाही. २८ व्या  षटकानंतर बांगलादेशचे ७ गडी बाद झाले. मेहदी हसन मिराज २ धावांवर आणि तस्किन अहमद २ धावा करून खेळत आहेत.

दरम्सयान, सलामीच्या फलंदाजांची  कामगिरी खराब झाली. बांगलादेशचे तीन फलंदाज बाद झाले असून १६ षटकात ९० धावा झाल्या आहेत. शाकिब अल हसनने ३६ चेंडूत ३२ धावा केल्या आहेत. तर यासिर अली १२ धावांवर खेळत आहे.

इशान किशनचे द्विशतक आणि विराट कोहलीच्या शतकी खेळीने भारताने मोठी धावसंख्या उभारली.  नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानासाठी उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढली. भारताने ५० षटकांत ८ बाद ४०९ धावसंख्या उभारली.

सलामीसाठी मैदानात उतरलेल्या इशान किशन आणि शिखर धवन जोडीने सावध सुरुवात केली होती. पण पाचव्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. शिखर धवनला मेहदी हसनने पायचित केले. इशान किशनला बऱ्याच दिवसांनी भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याचा पुरेपूर फायदा उठवत रोहितच्या जागी आलेल्या किशनने आपले शतक पूर्ण केले. किशनने इबादत हसनच्या एका षटकात १८ धावा केल्या. किशन-विराट जोडीने मोठी भागीदारी केली. २४ षटकांनंतर भारताने एक गडी गमावत १६२ धावा केल्या होत्या.

३०५ धावांवर भारताची दुसरी विकेट पडली. ३५ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूला इशान किशन १३१ चेंडूत २१० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत २४ चौकार आणि १० षटकार मारले. इशानचा हा १० वा एकदिवसीय सामना होता. त्याला नवव्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती.

३८ व्या षटकांच्या पहिल्या चेंडूतच ३२० धावांच्या स्कोअरवर भारताची तिसरी विकेट पडली. श्रेयस अय्यर तीन धावा करून बाद झाला. इबादत हसनने त्याला लिटन दासकरवी झेलबाद केले. श्रेयसने सहा चेंडूत तीन धावा केल्या. ४० व्या षटकाच्या ५ व्या चेंडूत एबादत हुसैनने केएल राहूलला बाद केले. त्याने १० चेंडूत ८ धावा केल्या.

इशान किशनचा व्‍दिशतकी धमाका

किशनला बऱ्याच दिवसांनी भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. त्‍याने या संधीचे सोने केले. रोहितच्या जागी आलेल्या किशनने आपले शतक पूर्ण केले. किशनने इबादत हसनच्या षटकात १८ धावा केल्या. दोन्ही फलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत भारताची धावसंख्या वेगाने पुढे नेली. किशनने वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने ८५ चेंडूत १०१ धावा पूर्ण केल्या. 25 षटकांनंतर भारताची धावसंख्या एक विकेट गमावून 170 धावा होती. टीम इंडिया मोठ्या धावसंख्येकडे वेगाने वाटचाल करत होता. यानंतर त्‍याने १०३ चेंडूत १५० धावा पूर्ण करत वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम तोडला. सेहवाग याने वेस्‍ट इंडिज विरुद्‍धच्या  इंदौरमधील सामन्यात ११२ चेंडूत १५० धावा केल्‍या होत्‍या. यानंतर त्‍याने १२६ चेंडूत ९ षटकार आणि २४ चौकार फटकावत आपलं व्‍दिशतक पूर्ण केले. शतक न झळकवता थेट व्‍दिशतकी खेळी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

विराट शतक झळकावून बाद

विराट कोहली शतक झळकावून बाद झाला. कोहलीने ९१ चेंडूत ११३ धावा केल्या. त्याने खेळीत ११ चौकार आणि २ षटकार मारले. शाकिब अल हसनने त्याला मेहदी हसन मिराज करवी झेलबाद केले. कोहलीने आपले ४४ वे वनडे शतक पूर्ण केले. त्याने ८५ चेंडूत एक षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७२ वे शतक आहे. ईशानच्या द्विशतकानंतर कोहलीच्या शतकामुळे भारताची धावसंख्या ३५० धावांच्या जवळ पोहोचली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news