पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यामध्ये इशान किशन आणि विराट कोहली यांनी सर्वोत्कृष्ट फलंदाजीचे दर्शन घडवले. इशान किशनच्या विश्वविक्रमी व्दिशतकी खेळी केली. यानंतर विराट कोहली याने ८५ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपलं शतक पूर्ण केले. विराटचे वनडेमधील ४४ वे तर कारकीर्दीतील ७२ वे शतक ठरले आहे. ९१ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ११३ धावांवर खेळणार्या विराटला मेहदी हसन मिराजने बाद केले.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यामध्ये सलामीवीर इशान किशनने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट फलंदाजीचे दर्शन घडवत व्दिशतक झळकावले. या सामन्यात इशान किशनने आपले शतक झळकावले. यानंतर त्याने १२६ चेंडूत ९ षटकार आणि २४ चौकार फटकावत आपलं व्दिशतक पूर्ण केले. शतक न झळकवता थेट व्दिशतकी खेळी करत त्याने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. ( IND VS BAN )
ईशान किशनला बऱ्याच दिवसांनी भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने केले. रोहितच्या जागी आलेल्या किशनने आपले. शतक पूर्ण केले. यानंतर त्याने १०३ चेंडूत १५० धावा पूर्ण करत. वीरेंद्र सहवान यांचा विक्रम तोला. सहवान याने वेस्ट इंडिज विरुद्ध इंदौरमधृये ११२ चेंडूत १५० धावा केल्या होत्या. इशान किशन याचे पहिलेच शतक ठरले होते. यानंतर त्याने १२६ चेंडूत ९ षटकार आणि २४ चौकार फटकावत आपलं व्दिशतक पूर्ण केले.शतक न झळकवता थेट व्दिशतकी खेळी करणार तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.