वाघळवाडीतील केळाच्या ‘त्या’ फलकाची बारामती तालुक्यात चर्चा

वाघळवाडीतील केळाच्या ‘त्या’ फलकाची बारामती तालुक्यात चर्चा
वाघळवाडीतील केळाच्या ‘त्या’ फलकाची बारामती तालुक्यात चर्चा

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा

सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी यादी रविवारी (दि. ३) प्रसिध्द केल्यानंतर या यादीत वाघळवाडी गावाला पुन्हा डावलण्यात आले. त्यामुळे नाराज कार्यकत्यांनी काळ्या निरा-बारामती रस्त्यावर केळाच्या चित्राचा बॅनर लावत निषेध व्यक्त केला. सोमवारी (दि. ४) सकाळपासूनच याची जोरदार चर्चा बारामतीच्या पश्चिम भागात रंगत होती.रविवारी रात्री काही वेळ हा फ्लेक्स लावण्यात आला. वडगाव पोलिसांनी मध्यस्थी करत हा बॅनर उतरवला. मात्र रविवारी रात्रीपासून सोशल मीडियावर याच फ्लेक्सची चर्चा सुरू आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने पॅनल जाहीर केला.

हा पॅनल जाहीर केल्यानंतर कार्यक्षेत्रात चर्चा नाही, मात्र अस्पष्ट अशी नाराजी उमटली. याचा परिणाम म्हणजे वाघळवाडी परिसरात केळाचे चित्र असलेला फलक प्रसिद्ध करण्यात आला. यामुळे खळबळ उडाली. सोशल मीडियावर हा फलक व्हायरल होताच काही काळातच फलक पोलिसांनी काढून टाकला. सोमेश्वरच्या निवडणुकीसंदर्भातील राष्ट्रवादीच्या सोमेश्वर विकास पॅनलची यादी जाहीर करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये उमेदवारी मिळण्यासाठी गर्दी जास्त होती. अर्जही अधिक आले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी मेळाव्यातच कोणीही रुसू नका कोणाची मनधरणी करणार नाही, असे आधीच स्पष्ट केले होते. मात्र वाघळवाडीतील कार्यकर्त्यांनी नाराजीतून हे कृत्य केल्याने चांगलीच चर्चा रंगली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news