बाळूमामाच्या नावानं चांगभलं : सुमित पुसावळेचं शुभमंगल सावधान!

sumit-monika
sumit-monika
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील प्रमुख कलाकार सुमित पुसावळे लग्नबेडित अडकला. 'बाळूमामा' या मालिकेत सुमित पुसावळेने मुख्य भूमिका साकारली आहे. १४ डिसेंबर रोजी सोलापूरमधील सांगोला येथे धूमधडाक्यात हा सोहळा पार पडला. या दोघांचे खूप सुंदर फोटो व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी प्री-वेडिंग शूट केलं होतं. त्यामुळे सुमितची चर्चा झाली होती. आता सुमितला कलाकारांसह चाहत्यांनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांच्या लग्नातील खास क्षणांचे फोटो व्हायरल होत आहेत. (बाळूमामाच्या नावानं चांगभलं)

मोनिका आणि सुमित दोघेही पारंपरिक वेषात दिसत असून त्यांचे सुंदर फोटो पाहण्यासारखे आहेत. सुमितच्या लग्नात त्याची ऑनस्क्रीन पत्नी सत्यवा म्हणजेच अभिनेत्री कोमल मोरे तसेच 'लागिर झालं जी' या मालिकेतील कलाकारांनीदेखील उपस्थिती लावली. त्याचबरोबर कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा झाला.

सुमितने आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, बाळूमामामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. या मालिकेत बाळूमामांच्या तरूणपणापासून ते त्यांच्या वार्धक्यापर्यंतच्या भूमिका सुमितने साकारल्या आहेत.

(photossumeet_pusavale_ka_diwana, sumeet_pusavale insta)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news