Maharashtra Congress | काँग्रेसमध्ये शह-काटशहाचे राजकारण विकोपाला! बाळासाहेब थोरात यांचा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा

Maharashtra Congress | काँग्रेसमध्ये शह-काटशहाचे राजकारण विकोपाला! बाळासाहेब थोरात यांचा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : प्रदेश काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) रंगलेल्या शह-काटशहाच्या राजकारणाचा फटका बाळासाहेब थोरात यांना बसला आहे. आता बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला पक्षश्रेष्ठींकडे पाठवून दिला असून त्यावर दिल्लीतील पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लागले आहे. विधान परिषद निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघात युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीचे प्रकरण पेटले आहे. यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये शह-काटशहाचे राजकारण रंगले आहे.

तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर संपूर्ण निवडणुकीत थोरात यांनी मौन पाळले होते. तसेच निवडणुकीनंतर त्यांनी सत्यजित तांबे यांची पाठराखण केल्याने काँग्रेस श्रेष्ठी नाराज असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.

थोरात हे सत्यजित तांबे यांचे मामा आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत खांद्याला फ्रॅक्चर झाल्याने ते रुग्णालयात होते. मात्र थोरात यांना महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देता आला असता. त्यांना मतदारांना आवाहन करता आले असते. असे असताना थोरात यांनी सोयीस्कर मौन पाळले. एकप्रकारे थोरात यांनी अपक्ष उमेदवार तांबे यांनाच मदत केली, अशी चर्चा काँग्रेसमध्ये आहे. त्याचा फटका थोरात यांना बसेल, असे बोलले जात आहे.

सत्यजित तांबे हे भाजपच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते भाजपमध्येही जाऊ शकतात. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीदेखील तांबे यांना भाजपमध्येच यावे लागेल असे संकेत दिले आहेत. अशावेळी विधिमंडळ पक्षाचे नेतेपद बाळासाहेब थोरात यांच्याकडे राहणे काँग्रेसला परवडणारे नाही. त्यामुळे लवकरच त्यांना या पदावरून हटविले जाईल, असे काँग्रेसमधून सांगण्यात येत आहे. (Maharashtra Congress)

१५ फेब्रुवारीला वादावर चर्चा

१५ फेब्रुवारी रोजी मुंबईत प्रदेश काँग्रेसची बैठक होणार आहे. राज्य प्रभारी एच. के. पाटील हे नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करणार आहेत. यावेळी काँग्रेसचे सर्वच वरिष्ठ नेते मुंबईत असतील. एच. के. पाटील थोरात – पटोले वादावर चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते आपला अहवाल दिल्लीत पक्षश्रेष्ठींना देणार असल्याचे समजते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news