Balasaheb Thackeray | “आजोबा नातवाचा पहिला मित्र”, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी आदित्य ठाकरेंची भावनिक पोस्ट

Balasaheb Thackeray
Balasaheb Thackeray

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतिदिन. आजी-आजोबा हा नातवंडांसाठी हळवा कोपरा असतो. बाळासाहेब ठाकरे यांचे नातू, उद्धव ठाकरे यांचे पुत्र, माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होवू लागली आहे. वाचा आदित्य ठाकरे यांची पोस्ट काय आहे?. (Balasaheb Thackeray)

फोटो साभार : आदित्य ठाकरे यांचे इन्स्टाग्राम अकाउंट
फोटो साभार : आदित्य ठाकरे यांचे इन्स्टाग्राम अकाउंट

Balasaheb Thackeray : वयाचं अंतर असतंच, पण मन जवळ…

प्रत्येक कुटुंबातील महत्त्वाचा घटक म्हणजे घरातील आजी-आजोबा. आजी-आजोबांचा आणि नातवंडांचं  खास असं नातं असतं. २३ जानेवारी १९२६ रोजी जन्मलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाला. आदित्य ठाकरे यांनी आपले आजोबा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमीत्त भावनिक पोस्ट शेअर करत, "आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो" असं म्हटलं आहे.

फोटो साभार : आदित्य ठाकरे यांचे इन्स्टाग्राम अकाउंट
फोटो साभार : आदित्य ठाकरे यांचे इन्स्टाग्राम अकाउंट

"आजोबा आणि नातू हे नातं जगात सगळ्यात 'स्पेशल' असतं…
त्यात आदर असतोच,
पण मैत्री जास्त असते…
धाक असतोच,
पण प्रेम जास्त असतं…
वयाचं अंतर असतंच,
पण मन जवळ असतं….
आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो…
त्यापेक्षा घट्ट मित्र दुसरा कोणीही असू शकत नाही!
मी भाग्यवान आहे की, जगासाठी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' असलेला युगपुरूष माझा 'आज्या' आहे. बाळासाहेबांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!"

आदित्य ठाकरे यांचं आपल्या आजोबांवर किती प्रेम आहे हे वेळोवेळी स्पष्ट होत आले आहे, यापूर्वीही अनेक आठवणी आणि फोटो आदीत्य ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या सोबतच्या शेअर केल्या आहेत.

फोटो साभार : आदित्य ठाकरे यांचे इन्स्टाग्राम अकाउंट. हा फोटो उध्वव ठाकरे यांनी क्लिक केलेला आहे.
फोटो साभार : आदित्य ठाकरे यांचे इन्स्टाग्राम अकाउंट. हा फोटो उध्वव ठाकरे यांनी क्लिक केलेला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news