Ayodhya Ram Mandir Updates: अयोध्येत आज ‘पंचभूसंस्कार’ विधी संपन्न; जाणून घ्या याविषयी सविस्तर

Ayodhya Ram Mandir LIVE Updates, ram mandir ayodhya photo, ram mandir photo, ram mandir location ayodhya, ram mandir location, ayodhya ka ram mandir, Ram Mandir, Ayodhya, Hindu Temple, Ayodhya Ram Mandir Updates
Ayodhya Ram Mandir LIVE Updates, ram mandir ayodhya photo, ram mandir photo, ram mandir location ayodhya, ram mandir location, ayodhya ka ram mandir, Ram Mandir, Ayodhya, Hindu Temple, Ayodhya Ram Mandir Updates

पुढारी ऑनलाईन डेस्क: देशासह जगभरातील वातावरण राममय झाले आहे. रामभक्त सोमवार २२ जानेवारी होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या प्रतीक्षेत आहेत. अयोध्येतील धार्मिक विधींना मंगळवार १६ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. राममंदिरातील विधींचा आज (दि.१९) चौथा दिवस. औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास आणि धनाधिवास यांसारखे धार्मिक विधी आज संपन्न होत आहेत. (Ayodhya Ram Mandir Updates)

आज सकाळी पंचभूसंस्कार धार्मिक विधी संपन्न

आज चौथ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता अरणिमंथन येथून अग्नी दिसू लागेल, असे श्री राम जन्मूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने म्हटले आहे. यापूर्वी त्यापूर्वी गणपतीसारख्या प्रस्थापित देवतांची पूजा, द्वारपालांकडून सर्व शाखांचे वेदपठण, देव प्रबोधन, औषधिवास, केशराधिवास, घृताधिवास, कुंडपूजन यांसारखे पंचभूसंस्कार संपन्न झाले. (Ayodhya Ram Mandir Updates)

सायंकाळी 'धनाधिवास' पूजा, आरतीने दिवसाची सांगता

तलावातील अर्निमंथनाद्वारे प्रकट झालेल्या अग्नीची स्थापना, ग्रहस्थान, असंख्य रुद्रपीठस्थान, प्रधानदेवतास्थापन, राजाराम – भद्रा – श्रीरामयंत्र – बीठदेवता – अंगदेवता – वापरदेवता – महापूजा, वरुणमंडल, योगिनीमंडलस्थापन, क्षेत्रपालमंडलस्थापन, गृहहोम, प्रस्थापित देवहोम, प्रसाद वास्तुशांती इ. धार्मिक विधी पार पडणार आहेत. तसेच आय सायंकाळी धनाधिवास पूजा आणि आरती होणार असल्याचे देखील ट्रस्टने म्हटले आहे. (Ayodhya Ram Mandir Updates)

मंगळवारी १६ जानेवारीपासून विधींना प्रारंभ

मंगळवार १६ जानेवारीपासून अयोध्येत धार्मिक विधींना सुरूवात झाली आहे. १६ जानेवारी तपश्‍चर्या आणि कर्मकुटी पूजेने रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात झाली. सलग सात दिवस हा विधी चालणार आहे. ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सुमारे तीन तास प्रायश्चित्त पूजा केली. यानंतर यजमानांनी शरयू नदीत स्नान केले. यानंतर मूर्ती उभारणीच्या जागेचे पूजन करण्यात आले. विष्णूची पूजा करून पंचगव्य आणि तूप अर्पण करून पंचगव्यप्राशन केले. द्वादशबद पक्षातून प्रायश्चित्त म्हणून दान केले. दशदानानंतर मूर्ती उभारण्याच्या ठिकाणी कर्मकुटी होम करण्यात आला. असा पहिल्या दिवशी विधी संपन्न झाला. त्यानंतर १७ जानेवारीला मूर्ती मंदिर परिसरात प्रवेश आणि भ्रमंती झाली. १८ जानेवारीला तीर्थपूजन, जलाधिवास आणि गंधाधिवास असे विधी पार पडले. (Ayodhya Ram Mandir Updates)

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील उर्वरित धार्मिक विधी

२० जानेवारी – शर्कराधिवास, फलधिवास, पुष्पाधिवास
२१ जानेवारी – मध्याधिवास, सायंकाळ शैय्याधिवास
२२ जानेवारी – पीएम मोदी यांच्या मुख्य उपस्थितीत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news