‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीसाठी 'उजव्या सोंड्यांच्या बाहुल्या' या कादंबरीला आज (दि.११) प्रदान करण्यात आला. कादंबरीचे लेखक प्रवीण बांदेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. येथील कमानी सभागृहात साहित्य अकादमी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार अर्पण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे नामवंत साहित्यिक उपमन्यु चटर्जी, साहित्य अकादमीचे नवनियुक्त अध्यक्ष माधव कौशिक तसेच नवनियुक्त उपाध्यक्ष कुमुद शर्मा आणि सचिव के. श्रीनिवास राव यांच्यासह २४ भाषेतील पुरस्कारार्थी साहित्यिक व्यासपीठावर उपस्थित होते.

मराठी भाषेसाठी 'उजव्या सोंड्याच्या बाहुल्या' या प्रायोगिक कादंबरीला वर्ष २०२२ चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोंकणी भाषेसाठी माया खरंगटे यांना त्यांच्या कोंकणी भाषेतील 'अमृतवेळ' या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला. उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही एक प्रायोगिक कादंबरी आहे.

या कादंबरीचा विषय समकालीन संस्कृती वरच्या संकटाचे नाट्यमय चित्रण यात केलेले आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण भागात लोकप्रिय असलेल्या चित्रकथी सारख्या लोककला प्रकारांचा उत्कृष्ट वापर केल्याने कादंबरीचे कथन तंत्र नाविन्यपूर्ण झालेले आहे. कादंबरीत अधूनमधून कोकणी आणि गोव्यातील बोलींच्या कलात्मक वापराने कादंबरीची कथनशैली समृद्ध झाली आहे. स्वतःची ओळख हरवून बसलेल्या विचारवंतांच्या नोस्टॅलीजीयाचे चित्रण अतिशय संवेदनशीलतेने केलेले आहे. या सर्व कथनामुळे उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही मराठी साहित्यकृती विशेष ठरली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news