Nashik Aviral Godavari : गोदेकाठी भरला स्वच्छतेचा ‘मिनी कुंभ’

Nashik Aviral Godavari : गोदेकाठी भरला स्वच्छतेचा ‘मिनी कुंभ’
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, येथे गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उत्तम काम होत असून, २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत प्लास्टिकमुक्त गोदावरीचा संकल्प करून गोदावरी नदीला शुद्ध करू या, असे आवाहन आध्यात्मिक गुरू श्री. एम. यांनी केले. (Nashik Aviral Godavari)

स्वच्छता अभियानांतर्गत गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी अविरल गोदावरी (Nashik Aviral Godavari) अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचा प्रारंभ सोमवारी (दि. २) योगयोगेश्वर जय शंकर सेवाभावी संस्थेचे प्रमुख दादा महाराज जगताप यांच्या हस्ते गोदापूजनाने करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. श्री. एम. म्हणाले की, गोदाप्रदूषणमुक्तीसाठी सांघिक प्रयत्नांची गरज आहे. महापालिकेच्या माध्यमातून प्रदूषणमुक्तीसाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत गोदावरी नदी प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प प्रत्येक नागरिकाने करायला हवा. त्यासाठी प्रदूषणमुक्तीच्या कार्यात नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून प्रदूषणमुक्त गोदामाई करावी, असे आवाहनही श्री. एम. यांनी केले.

संबधित बातम्या :

जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले की, नाशिकमध्ये स्वच्छता हे एक प्रमुख ध्येय असून, त्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे, त्याचबरोबर हरित नाशिक, स्वच्छ नाशिक करून आगामी होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा हरित कुंभ म्हणून केला जाईल. त्यामध्ये सर्वांचे सहकार्य व भूमिका महत्त्वाची आहे.

यावेळी श्री. एम. यांच्यासह मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर यांच्या हस्ते गोदामाईची महाआरती करण्यात आली. श्री. एम. यांनी पर्यावरणावर स्वलिखित पुस्तक व्यासपीठावरील मान्यवरांना भेट देऊन त्यांचा गौरव केला. या कार्यक्रमात ललित बारी या विद्यार्थ्याने जलप्रतिज्ञा दिली. अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद व अभिनेते किरण भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. राजेश पंडित यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपआयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड, भाजप नेते लक्ष्मण सावजी, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे जितूभाई ठक्कर, उद्योजक हेमंत राठी, नमामी गोदाचे राजेश पंडित, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, स्थायी समिती माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके, अभिजित पवार, पंचवटी विभागीय अधिकारी योगेश रकटे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते.

गोदा स्वयंसेवकांशी संवाद

अविरल गोदावरी मोहिमेंतर्गत गंगापूर अमरधाम, सोमेश्वर धबधबा, सोमेश्वर मंदिर, नवश्या गणपती, आनंदवली गावातील पूल, शहीद अरुण चित्ते पूल, सुयोजित गार्डन पूल परिसर, सुंदर नारायण मंदिर व अहिल्याबाई होळकर पूल ते गाडगे महाराज पूल आदी भागांत सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी आध्यात्मिक गुरू श्री. एम. यांनी केली. यावेळी त्यांनी स्वच्छता करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत सिनेअभिनेता चिन्मय उदगीरकर, मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी आदी उपस्थित होते.

अभियानात या संस्थांचा सहभाग

अविरल गोदावरी मोहिमेत जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक महापालिका, नमामि गोदा फाउंडेशन, द सत्संग, कॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया, प्लॉगर्स ग्रुप, शौर्य फाउंडेशन, उडान फाउंडेशन, बाल विद्या प्रसारक मंडळ संचलित, आदर्श माध्यमिक विद्यालय, सीबीएस, ज्ञान अमृत आदिवासी संस्था, नाशिक पोलिसमित्र समन्वय समिती, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, अशोका एज्युकेशन फाउंडेशन, मराठा विद्या प्रसारक संस्था, सिडको महाविद्यालय, गुरुगोविंद सिंग फाउंडेशन, के. के. वाघ एज्युकेशन संस्था, सपकाळ नॉलेज हब, इंडियन मेडिकल असोसिएशन, समता समाज विकास संस्था संचलित आदर्श विद्यामंदिर, नाशिकरोड, योग योगेश्वर जय शंकर सेवाभावी संस्था, सप्तशृंगी कॉलेज.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news