पुणे; पुढारी वृत्तसेवा : जूनच्या सरासरीत महाराष्ट्रात यंदा 86 टक्क पावसाची तूट आल्याने आपले राज्य यंदा अवर्षणग्रस्त राज्यांच्या यादीत गेले आहे.19 जूनपर्यंत राज्यातील पावसाची सरासरी 102 मिलिमीटर आहे. मात्र, यंदा केवळ 14.5 मि.मी इतका कमी पाऊस झाला आहे. गेल्या पाच वर्षांतला हा नीचांकी पाऊस ठरला आहे. (Moonson)
केरळमध्ये मान्सून यंदा सात दिवस उशिरा आला. महाराष्ट्रात तळकोकणात येण्यास त्याला 11 जून ही तारीख उजाडली त्यामुळे पुढे तो 15 ते 18 जूनपर्यंत राज्य काबीज करेल, असा अंदाज होता. मात्र सर्व अंदाज फोल ठरवत मान्सून गेले नऊ दिवस तेथेच अडखळला आहे. त्याची दुसरी शाखा पश्चिम बंगालमध्ये गेली, मात्र पहिली शाखा महाराष्ट्राच्या तळकोकणातच अडखळल्याने देशात गुजरात, कच्छ, सौराष्ट्र आणि राजस्थान वगळता सर्वच राज्ये अवर्षणाच्या यादीत आली आहेत. (Moonson)
विभागवार पावसाची तूट..(19 जून पर्यंत) (Moonson)
कोकण विभाग : उणे 80 टक्के तूट
(सरासरी : 327 मि.मी :पडला : 66.4 मी.मी)
जिल्हावार तूट : मुंबई 92%, पालघर 70%, रायगड 83%,रत्नागिरी 86%, सिंधुदुर्ग 80%, मुंबई उपनगर 93%,
मध्य महाराष्ट्र (तूट :उणे 86%,)
(सरासरी : 92.9 मी.मी, पडला :20.4 मि.मी)
जिल्हावार तूट : पुणे 78,कोल्हापूर 88, नगर 79, सांगली 83, सातारा 88, सोलापूर 99
मराठवाडा विभाग (तूट :90 टक्के)
जूनमधील राज्यात पावसाची स्थिती (19 जून पर्यंत)
खरिपाचा जेमतेम १.२३ टक्के पेरा
राज्यात मान्सूनच्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. खरीप हंगामातील मूग आणि उडदाच्या पेरण्या अडचणीत आल्या असून केवळ पाण्याच्या उपलब्धता असलेल्या बागायती क्षेत्रातच प्रामुख्याने कापूस, भात रोपवाटिका व अन्य पिकांची मिळून 1 लाख 74 हजार 556 हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या जेमतेम 1.23 टक्के क्षेत्रावरच खरिपातील पेरण्या पूर्ण होऊ शकलेल्या आहेत.
आणखी आठवडाभरानंतर पावसाची हजेरी अपेक्षित असून मूग, उडीद वगळता अन्य पिकांच्या पेरण्यांवर परिणाम होणार नसल्याचा दावा कृषी आयुक्तालयाकडून करण्यात येत आहे.
राज्यातील खरीप हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र 142 लाख हेक्टरइतके आहे. गतवर्षी 19 जूनअखेर राज्यात सुमारे 7 लाख हेक्टरइतक्या (4.93 टक्के) क्षेत्रावरील खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. कारण पावसाची हजेरी सुरुवातीस चांगली असल्याने पेरण्यांनी काहीसा वेग घेतला होता. मात्र, मान्सूनच्या पावसाची हजेरीच नसल्यामुळे पेरण्यांना अडचणी आल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिक डी. बी. पाटील यांनी दिली.
सध्या सर्वाधिक पेरणी कापसाची झाली असून ती 1 लाख 26 हजार हेक्टरइतकी आहे. त्या खालोखाल भाताच्या रोपवाटिका 43 हजार 110 हेक्टर, रागी 2500 हेक्टर, मका 1 हजार हेक्टर, मूग 20 हेक्टर, उडीद 22 हेक्टर इतका आहे.
मंत्रालयात सोमवारी (दि. 19) कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खरीप हंगामाबाबत आढावा बैठक घेतली आहे. येत्या आठवडाभरात मान्सूनच्या पावसाचा अंदाज तज्ज्ञांकडून बैठकीत वर्तविण्यात आला आहे. पाऊस लांबल्यास मूग, उडदाऐवजी अन्य कोणती पिके घ्यावी लागतील या बाबत कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंसमवेत मंगळवारी (दि. 20) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यामध्ये पावसाची स्थिती व अन्य विषयांवर चर्चा होईल.
– सुनील चव्हाण, कृषी आयुक्त, कृषी आयुक्तालय, पुणे
अधिक वाचा :