India vs Australia 1st T20I : ऑस्ट्रेलियाने भारताला ४ विकेटने केले पराभूत

India vs Australia 1st T20I : ऑस्ट्रेलियाने भारताला ४ विकेटने केले पराभूत
Published on
Updated on

मोहाली; वृत्तसंस्था : 20 षटकांत 208 धावा करूनही दुबळ्या गोलंदाजीमुळे भारताचा पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून (India vs Australia 1st T20I) 4 विकेट आणि 4 चेंंडू राखून पराभव झाला. भारताच्या अक्षर पटेल वगळता सर्वच गोलंदाजांनी 13 च्या सरासरीने धावा दिल्या. हार्दिक पंड्या, के. एल. राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 209 धावांचे आव्हान ठेवले होते. हार्दिक पंड्याने 30 चेंडूंत नाबाद 71 धावा चोपल्या; तर सलामीवीर के. एल. राहुलने 55 आणि सूर्यकुमार यादवने 25 चेंडूंत 46 धावांची खेळी केली. पण हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 4 चेंडू राखून पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरुन ग्रीन (61) याने धुवाँधार सलामी दिली तर मॅथ्यू वेड (45) याने सुंदर फिनिशिंग केले.

मोहालीच्या स्टेडियमवर भारताच्या द्विशतकी आव्हानाचा पाठलाग करताना अ‍ॅरोन फिंचने (India vs Australia 1st T20I) भुवनेश्वरकुमारला षटकार ठोकून डावाची सुरुवात केली. कॅमेरुन ग्रीन आणि फिंच यांनी 3 षटकांत 38 धावा दिल्या. चौथ्या षटकांत अक्षर पटेलने फिंचचा त्रिफळा उडवून भारताला पहिले यश मिळवून दिले. पण याचा परिणाम ऑस्ट्रेलियावर झाला नाही. दहाव्या षटकात त्यांनी शंभरी गाठली होती. दहा षटकाच्या ब्रेकनंतर अक्षर पटेलनेच दुसरी विकेट मिळवून दिली. कॅमेरुन ग्रीनने मारलेला फटका उंच गेला आणि कोहलीच्या हातात लँड झाला. ग्रीनने 30 चेेेंडूत 61 धावा केल्या. यानंतर उमेश यादव गोलंदाजीला आला. त्याच्या पहिल्या दोन चेंडूवर षटकार आणि चौकार गेले. परंतु पुढच्या षटकांत स्मिथ (35) आणि ग्लेन मॅक्सवेल (1) या दोघांची विकेट घेत भारताला सामन्यात परत आणले. अक्षर पटेलने आपली तिसरी विकेट घेताना जोस इंग्लिसचा लेगस्टम्प (17) उडवला. याबरोबच अक्षरने आपला स्पेल 4-0-17-3 असा संपवला. 15 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 148 धावा झाल्या होत्या. त्यांना विजयासाठी 5 षटकांत 61 धावांची आवश्यकता होती. मैदानावर मॅथ्यू वेड आणि टीम डेव्हीड होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला चिंता नव्हती.

हर्षल पटेलने 16 षटकांत फक्त 6 धावा दिल्या. परंतु त्यानंतर भुवनेश्वरकुमारने 15 आणि हर्षलने 18 व्या षटकांत 22 धावा दिल्या. 9 व्या षटकांत भुवनेश्वरने 16 धावा दिल्या. त्यामुळे शेवटच्या षटकांत 2 धावांची ऑस्ट्रेलियाला आवश्यकता होती. चहलने टीम डेव्हीडला (18) बाद केले, पण कमिन्सने विजयी चौकार ठोकला. (India vs Australia 1st T20I)

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हेजलवूडने रोहित शर्माला 11 धावांवर बाद केले. तर एलिकने विराट कोहलीला 2 धावांवर माघारी धाडले. मात्र त्यानंतर के.एल. राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी पडझडीनंतर संघाला 10 षटकांत 86 धावांपर्यंत पोहोचवले. के. एल. राहुलने अर्धशतकी खेळी करत भारताला शंभरी पार करून दिली. मात्र जॉस हेजलवूडने के.एल. राहुलला 55 धावांवर बाद करत तिसर्‍या विकेटसाठी रचलेली 68 धावांची भागीदारी तोडली. यानंतर सूर्यकुमारने 25 चेंडूंत 46 धावा चोपल्या असताना कॅमेरून ग्रीनने त्याला बाद केले. सूर्यापाठोपाठ अक्षर पटेल देखील 6 धावांची भर घालून परतला.

यानंतर हार्दिक पंड्याने डावाची सूत्रे हातात घेत भारताला 17 षटकांत 160 धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र एलिसने दिनेश कार्तिकला 6 धावांवर बाद करत भारताला सहावा धक्का दिला. हार्दिकने 25 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने शेवटच्या षटकात कॅमेरून ग्रीनला सलग तीन षटकार मारत भारताला 208 पर्यंत पोहोचवले. हार्दिकने 30 चेंडूंत नाबाद 71 धावा केल्या.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news