नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट

लासलगाव (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यातील कांदा व्यापारी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. विविध आणि प्रलंबित मागण्यांसाठी कांदा व्यापाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कांदा व्यापाऱ्यांचा संप सुरू झाला आहे.

अनेक ठिकाणी लिलाव बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व 17 बाजार समिती आणि उपबाजार समितीत कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही कांदा विक्रीस न आणल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news