पुढारी ऑनलाईन डेस्क : समाजवादी पार्टीचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहताना भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar Tweet) यांची केलेले ट्विट चर्चेत आले आहे.
समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी दिली. त्यांच्यावर २६ सप्टेंबरपासून ग्रुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. "माझे आदरणीय पिता आणि सर्वांचे नेते या जगात राहिले नाहीत," असे ट्विट अखिलेश यादव यांनी केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांनी मुलायमसिंह यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडेलवरुन ट्विट (Atul Bhatkhalkar Tweet) करत मुलायमसिंह यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती ते पाहून गेले. प्रभू राम त्यांच्या आत्म्याला उत्तमगती देवो.
हेही वाचलंत का?