बीएसएफच्या ४ सहकाऱ्यांना गोळ्या घालून मारणारा हल्लेखोर जवान बेळगाव जिल्ह्यातील !

बीएसएफच्या ४ सहकाऱ्यांना गोळ्या घालून मारणारा हल्लेखोर जवान बेळगाव जिल्ह्यातील !

बेळगाव; पुढारी ऑनलाईन : पंजाबमधील अमृतसर येथे असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) मेसमध्ये एका जवानाने संतप्त होऊन गोळीबार केला. या घटनेत गोळी झाडणाऱ्या जवानासह ५ जवानांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गोळी झाडणाऱ्या जवानाने स्वत:वरही गोळी झाडली. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचाही मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या आरोपी जवानाचे नाव सट्टाप्पा सिद्धाप्पा किल्लारगी असे आहे.

दरम्यान, ४ जवानांचा जीव घेणारा हल्लेखोर जवान बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी गावचा आहे. याबाबत त्यांच्या कुटूंबियांकडून समजलेली माहिती अशी की, मानसिक अस्वस्थता व मानसिक संतुलन बिघडल्याचा कारणावरून त्याने आपल्याच सहकाऱ्यांवर बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वतःही डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली.

सट्टाप्पा सिद्धाप्पा किल्लारगी बऱ्याच दिवसांपासून सुट्टी मिळत नव्हती. त्यामुळे तो खूप अस्वस्थ होता. सतत ड्युटीमुळे त्रासलेल्या सट्टाप्पाने शनिवारी बीएसएफ अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. यादरम्यान सत्ताप्पाचा अधिकाऱ्यांशी वादही झाला. मात्र, असे असूनही सत्ताप्पाला दिलासा मिळाला नाही.

मृतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत

  • सीटी सट्टाप्पा एसके – कर्नाटक
  • एचसी राम विनोद – बिहार
  • एच. सी. तोरस्कर डीएस- महाराष्ट्र
  • एचसी रतन सिंह – जम्मू आणि काश्मीर
  • एचसी बलजिंदर कुमार – हरियाणा पानिपत

रविवारी कर्तव्यावर असताना गोळीबार

सट्टाप्पा रविवारी सकाळी ड्युटीवर असताना रागाच्या भरात त्याने आपल्या रायफलने गोळीबार सुरू केला. गोळीबाराचा आवाज ऐकून इतर सैनिक इकडे तिकडे धावू लागले. जवानाने केलेल्या गोळीबारात आतापर्यंत ५ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे.

या घटनेनंतर शहीद जवानांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली जात आहे. बीएसएफचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेण्याची तयारीही सुरू केली आहे.

चौकशीसाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश

या घटनेबाबत बीएसएफने जारी केलेल्या निवेदनात या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कोर्ट ऑफ इन्क्वायरी देण्यात आल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news