Swara Bhaskar: अतिक अहमदच्या हत्येनंतर स्वरा भास्कर संतापली, म्हणाली…

Swara Bhaskar: अतिक अहमदच्या हत्येनंतर स्वरा भास्कर संतापली, म्हणाली…

प्रयागराज, पुढारी ऑनलाईन : Swara Bhaskar on Atiq Ahmed Shot Dead : प्रयागराज येथे वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तीन हल्लेखोरांनी अतिक आणि अशरफ यांच्यावर गोळीबार केला. या तिन्ही हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेवर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या बेधडक मतांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेसुद्धा या घटनेबाबत ट्विट केले आहे. तिचे हे ट्वीट खूप चर्चेत आले असून यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

स्वराने ट्वीटमध्ये म्हटलंय की, 'अतिरिक्त न्यायालयीन हत्या किंवा चकमक ही आनंद व्यक्त करण्यासारखी गोष्ट नाही. हे अराजकतेचे लक्षण दर्शवते. राज्य संस्थांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, कारण ते गुन्हेगारांसारखे वागत आहेत किंवा त्यांना सक्षम करीत आहेत हे यातून दिसून येते. हे कठोर शासन नाही, ही अराजकता आहे.' (Swara Bhaskar on Atiq Ahmed Shot Dead)

स्वरा भास्करच्या पतीचे ट्विट..

स्वरा भास्करचा पती आणि समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद यानेसुद्धा अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येनंतर ट्विट केले आहे. 'अनेकांना वाटेल की आम्ही मुस्लिम आहोत म्हणूनच आम्ही असद अहमदच्या एन्काऊंटरला विरोध करत आहोत. मात्र हा तुमचा गैरसमज आहे. आम्ही विकास दुबेच्या एन्काऊंटरचेसुद्धा समर्थन केले नव्हते आणि कधी करणारही नाही. तुमचा राज्यघटना आणि संस्थांवर विश्वास नाही. असदचे प्रकरण एकदम स्पष्ट होते. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असती आणि तो आयुष्यभर तुरुंगात राहिला असता. जर तुरुंगातून त्याने गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला असता तर त्याला सरकार जबाबदार असती. बुलडोझरने किंवा एन्काऊंटरने गुन्हेगारी संपेल या भ्रमात तुम्ही लोक आहात. पण बुलडोझर आणि एन्काऊंटरने फक्त हुकूमशाही येईल बाकी काही नाही', असे त्याने म्हटले आहे. (Swara Bhaskar on Atiq Ahmed Shot Dead)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news