Assam : आसाममध्ये पुरस्थिती गंभीर; ब्रह्मपुत्रा नदीने इशारा पातळी ओलांडली

Assam
Assam

पुढारी ऑनलाईन : आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तसेच दिब्रुगडमधील ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याच्या पातळीने देखील इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे सोनितपूरसह अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून ९८,८०० हून अधिक लोक प्रभावित झाले (Assam) आहेत.

सखल भागात राहणाऱ्या लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले आहे. आतापर्यंत आसाममधील सहा जिल्ह्यांतील ५३,००० लोक पुरामुळे अडकून पडले आहेत. सुमारे तीन हजार हेक्टर पीक क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. अनेक स्थानिक लोकांना पूरग्रस्त भागातून बाहेर पडून रस्त्यावर राहावे (Assam) लागत आहे.

Assam: ईशान्येकडील 'या' राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधारेचा इशारा

भारतीय हवामान खात्याने (IMD) आज ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील पाच दिवसांत देशातील उर्वरित भागांमधील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता (Assam) आहे, असेही हवामान विभागाने म्हटलं आहे.

३१ ऑगस्टपर्यंत पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज

पश्चिम मान्सून सध्या हिमालयाच्या पायथ्याशी सक्रीय आहे. मान्सूनचा हा पट्टा हळूहळू गोरखपूर, पाटणा, मलाड, पूर्वेकडील मणिपूर, दक्षिण आसामच्या भागाकडे सरकरत आहे. त्यामुळे पुढच्या आठवडाभरात उत्तरेतील मान्सून कमी होईल आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता असून, पुढे मान्सून दक्षिणेकडे सरकेल असेही हवामान विभागाने रविवारी दिलेल्या बुलेटिनमध्ये स्पष्ट केले होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news