Asian Para Games: बॅडमिंटनमध्ये ‘नित्या श्री’ ला कांस्यपदक; पॅरा गेम्समध्ये भारताच्या नावावर ७३ पदके

Asian Para Games Nitya sre
Asian Para Games Nitya sre
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: आशियाई पॅरा गेम्स, २०२३ मध्ये भारताची बॅडमिंटनपटू 'नित्या श्री' हिने एकेरी  बॅडमिंटन स्पर्धेत आज (दि.२६) कांस्यपदकाची कमाई केली आहे. या कांस्यपदाकसह भारताने ७३ वे पदक मिळवत एशियन पॅरा गेम्समध्ये नवीन इतिहास रचला आहे. पीएम मोदींनी देखील 'नित्या श्री' हिचे अभिनंदन केले आहे. या संदर्भातील पोस्ट पीएम मोदींनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून केली आहे. (Asian Para Games)

एशियन पॅरा गेम्स, २०२३ मध्ये भारताने दमदार कामगिरी करत नवीन इतिहास रचला आहे. यंदाच्या पॅरा गेम्समध्ये भारताने आतापर्यंत एकूण ७३ पदकांची कमाई केली आहे. भारतीय खेळाडूंकडून अजूनही पदकांची कमाई सुरूच आहे. ही देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. या संदर्भातील माहिती 'भारतीय क्रीडा प्राधिकरण'ने (SAI Media) त्यांच्या अधिकृत 'X' अकाऊंटवरू दिली आहे. (Asian Para Games)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news