Asian Para Game Chess | बुद्धिबळमध्ये हिमांशी राठीची कांस्यपदकावर मोहर

Asian Para Games
Asian Para Games

पुढारी ऑनलाईन डेस्क : एशियन पॅरा गेम्सच्या बुद्धिबळमध्ये भारताच्या हिमांशी राठी हिने चमकदार कामगिरी केली. तिने महिला बुद्धीबळमध्ये कांस्यपदकावर मोहर उमटवली. या संदर्भातील वृत्त 'भारतीय क्रीडा प्राधिकरण'ने (SAI Media) त्यांच्या अधिकृत 'X' अकाऊंटवरू दिले आहे. (Asian Para Game Chess )

पॅरा गेम्समध्ये भारताचा नवीन विक्रम; ७३ हून अधिक पदकांची कमाई

२०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने ७२ पदकांची कमाई केली होती. आशियाई पॅरा गेम्स २०२३ मध्ये भारताने आपलाच विक्रम मोडत ७३ हून अधिक पदकांची कमाई केली आहे. भारतीय खेळाडूंकडून अजूनही पदकांची कमाई सुरूच आहे. ही देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. या संदर्भातील माहिती 'भारतीय क्रीडा प्राधिकरण'ने (SAI Media) त्यांच्या अधिकृत 'X' अकाऊंटवरू दिली आहे. (Asian Para Game Chess)

Asian Para Game Chess: पीएम मोदींकडून खेळाडूंचे अभिनंदन

जकार्ता येथे २०१८ मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समधील आमचा मागील ७२ पदकांचा विक्रम मोडून, भारताने अभूतपूर्व ७३ पदके जिंकून आणि अजूनही मजबूत करत आशियाई पॅरा गेम्समधली एक अतुलनीय कामगिरी केली आहे. हा महत्त्वाचा प्रसंग आमच्या खेळाडूंच्या अथक निर्धाराला मूर्त रूप देतो. आमच्या अपवादात्मक पॅरा-अॅथलीट्ससाठी एक गर्जना करणारा जल्लोष ज्यांनी इतिहासात आपले नाव कोरले आहे. यावेळी प्रत्येक भारतीयाचे हृदय प्रचंड आनंदाने भरून गेले आहे. खेळाडूंची बांधिलकी, दृढता आणि उत्कृष्टतेची अटळ मोहीम खरोखरच प्रेरणादायी आहे. ही ऐतिहासिक कामगिरी भावी पिढ्यांना मार्गदर्शक प्रकाश, प्रेरणादायी ठरू दे, असेही पीएम मोदी यांनी म्हटले आहे. या संदर्भातील पोस्ट पीएम मोदी यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून केली आहे. (Asian Para Game Chess)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news