Asian Games 2023 : बॉक्सिंग : निकतचे पदक निश्चित

Asian Games 2023 : बॉक्सिंग : निकतचे पदक निश्चित

हाँगझोऊ : वृत्तसंस्था : भारताची स्टार बॉक्सर निकत झरिन हिने एशियन गेम्समध्ये दमदार खेळाचे प्रदर्शन करीत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. याबरोबरच तिचे पदक पक्के झाले असून, तिला पॅरिसमध्ये होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रताही मिळाली आहे.

दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणार्‍या झरिनने महिलांच्या 50 किलोग्रॅम गटात जॉर्डनच्या नासार हनान हिला तीन मिनिटात नेस्तनाबूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. एशियन गेम्स 2023 मध्ये आपला तिसरा सामना खेळणार्‍या निकतला नासारचे आव्हान जाणवलेच नाही. निकतच्या धडाकेबाज पंचने नासार तीन मिनिटात घायाळ झाली. आता तिची लढत थायलंडच्या चुथामात रकसत हिच्याविरुद्ध होणार आहे.

संबंधित बातम्या : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news