Asian Games 2023 : भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतीय संघ आशियाई स्पर्धेत सहभागी होणार

Asian Games 2023 : भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतीय संघ आशियाई स्पर्धेत सहभागी होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही फुटबॉल संघ सहभागी होणार आहेत. याची माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून दिली आहे. अनुराग ठाकूर म्हणाले की, भारतीय फुटबॉल संघाने नुकतीच केलेली कामगिरी पाहता क्रीडा मंत्रालयाने नियम शिथिल करत दोन्ही संघांना आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. (Asian Games 2023)

भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीमॅक यांनी मंत्री अनुराग ठाकूर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी पत्र लिहिले होते. यानंतर क्रीडा मंत्रालयाने भारतीय फुटबॉल संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. (Asian Games 2023)

आशियाई फुटबॉल संघांच्या फिफा क्रमवारीत दोन्ही संघ अव्वल आठमध्ये नसल्याने क्रीडा मंत्रालयाच्या नियमानुसार भारतीय पुरुष आणि महिला संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाहीत. परंतु दोन्ही संघांची अलीकडची कामगिरी लक्षात घेऊन त्यांना विशेष सूट देण्यात आली आहे.

मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की "भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आमचे राष्ट्रीय फुटबॉल संघ, पुरुष आणि महिला दोन्ही, आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने सहभागास मान्यता दिली आहे.

काय आहे क्रीडा मंत्रालयाचा नियम?

क्रीडा मंत्रालयाच्या नियमांनुसार, भारतीय संघ प्रत्येक खेळात भाग घेऊ शकतो, जो या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल आठमध्ये समाविष्ट आहे. जर असे आठ संघ आधीच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असतील, ज्यांची क्रमवारी भारतीय संघापेक्षा चांगली असेल, तर भारत या स्पर्धेसाठी आपला संघ पाठवत नाही. फुटबॉलच्या बाबतीतही असेच आहे.

भारतीय पुरुष आणि महिला संघांपेक्षा वरच्या क्रमांकावर असलेले अनेक संघ या स्पर्धेत आधीच भाग घेत आहेत. याच कारणामुळे भारतीय संघाला या स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी नव्हती, मात्र प्रशिक्षक स्टिमॅक यांच्या मागणीवरून नियम शिथिल करण्यात आले असून भारतीय संघ आता या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news