Asia Cup Final : श्रीलंकेची ‘आशिया कप’वर सहाव्यांदा मोहर

Asia Cup Final : श्रीलंकेची ‘आशिया कप’वर सहाव्यांदा मोहर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक २०२२ चा पाकिस्तानविरूद्धचा अंतिम सामना जिंकत श्रीलंकेने सहाव्यांदा 'आशिया कप' आपल्या नावावर केला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. यापूर्वी श्रीलंकेने ५ वेळेस आशिया कप आपल्या नावावर केला होता. आशिया चषक २०२२ च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर २३ धावांनी विजय मिळवला. (Asia Cup Final)

अंतिम सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने प्रथम गोलंदाजी निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेने पाकिस्तानसमोर १७१ धावांचे आव्हान ठेवले होते. यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार खान शिवाय कोणीही टिकू शकले नाही. श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगाने ४ षटकांमध्ये २७ धावा देत ३ विकेट्स पटकावल्या. तर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज प्रमोद मदुशन याने पाकिस्तानला सुरवातीचे झटके दिले. प्रमोद मदुशन आणि वनिंदु हसरंगा यांच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानचा संघ अशरक्ष: ढेपाळला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने ४९ चेंडूमध्ये ५५ धावा तर इफ्तिखार अहमदने ३१ चेंडूमध्ये ३२ धावा केल्या. मोहम्मद रिझवानची विकेट गमावल्यानंतर पाकिस्ताच्या विजयाची आशा मावळल्या. (Asia Cup Final)

तत्पूर्वी, श्रीलंकेने २० षटकांअखेर ६ बाद १७० धावा केल्या. भानुका राजपक्षे ४५ चेंडूमध्ये ७१ धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने १७० धावा केल्या. वहिंदू हसरंगा २१ चेंडूत ३६ तर धनंजय डिसिल्वा २१ चेंडूमध्ये २८ धावा करत श्रीलंकेची धावसंख्या १७० धावांपर्यंत पोहचवली. ९ षटकानंतर श्रीलंकेचा संघ गारद झाला होता. ९ षटकानंतर श्रीलंकेचा डाव वनिंदु हसरंगा आणि भानुका राजपक्षेने सावरला. दोघांनी ६ व्या विकेटसाठी ५८ धावांची भागिदारी करत श्रीलंकेची धावसंख्या १७ षटकानंतर श्रीलंकेची धावसंख्या १३६ पर्यंत नेली. (Asia Cup Final)

हसरंगा बाद झाल्यानंतर भानुका राजपक्षे आणि करुणारत्नेने शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत श्रीलंकेची धावसंख्या १७० धावांपर्यंत नेली. पाकिस्तानकडून हॅरिस रौफने ४ षटकांमध्ये २९ धावा देत ३ बळी घेतले. तर नसीम शाह, शाबाद खान आणि इफ्तिखार अहमद यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी केलेल्या श्रीलंकेला १७० धावांपर्यंत रोखण्यात यश आले होते. (Asia Cup Final)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news