पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक २०२३ मधील सुपर ४ चा शेवटचा सामना आज भारत आणि बांगलादेश (IND VS BAN) यांच्यात होणार आहे. भारत आणि श्रीलंका फायनलमध्ये पोहोचले आहेत, त्यामुळे आजचा सामना केवळ औपचारिक सामना असेल. आशिया चषक २०२३ सुपर ४ चा शेवटचा सामना आज भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे.
संबंधित बातम्या
सुपर-4 चे दोन्ही सामने जिंकून टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचली आहे, तर बांगलादेशला आतापर्यंत सुपर-4 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या शेवटच्या सामन्यात भारत विजयाची हॅट्ट्रिक करू शकतो, तर बांगलादेशला शेवटचा सामना जिंकून आपला प्रवास संपवावा लागेल.
कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर आज भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुपारी ३ वाजता सामना सुरु होईल. कोलंबोमध्ये आज पावसाची ८८ टक्के शक्यता आहे. Accuweather च्या अहवालानुसार, भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात पावसाचा परिणाम काही तासांपुरताच होऊ शकतो. कोलंबोमध्ये संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सामना काही काळ थांबवला जाऊ शकतो. मात्र, त्यानंतर पावसाची शक्यता फारच कमी आहे.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
बांगलादेश : शकीब अल हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, मेहिदी हसन, लिटन दास, तौहीद हृदोय, मुशफिकूर रहीम, शमीम हुसेन, नसूम अहमद, तस्किन अहमद, शोरीफूल इस्लाम, हसन महमूद.
हेही वाचा :