बबनराव तायवाडे यांच्या निमंत्रणावरून नागपुरात सर्वपक्षीय नेते एकवटणार

बबनराव तायवाडे यांच्या निमंत्रणावरून नागपुरात सर्वपक्षीय नेते एकवटणार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – एकीकडे राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष टोकाचा होत असताना दुसरीकडे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या निमंत्रणावरून नागपुरात सर्वपक्षीय नेते एकवटणार आहेत. विशेष म्हणजे गेले काही दिवस भाजपात जाणार, अशी चर्चा सुरू असणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार कृपाल तुमाने, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील यावेळी प्रमुख अतिथी असणार आहेत.

संबंधित बातम्या –

तायवाडे यांचा मुलगा अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. शौनक तायवाडे यांच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन येत्या 27 जानेवारी रोजी नागपुरात होऊ घातले आहे.या उद्घाटन सोहळ्यासाठी ही सर्व नेते मंडळी एका व्यासपीठावर येणार आहेत. ओबीसी महासंघाचे हे निमंत्रण अर्थात सर्वांनी एकदिलाने स्वीकारले असले तरी राजकीयदृष्ट्या चर्चेत असलेल्या या कार्यक्रमात नेमके कोण-कोण येणार, कोण कुणाच्या शेजारी बसणार, याविषयीचा उलगडा मात्र कार्यक्रमाच्या निमित्तानेच होणार आहे. आपले सर्वांशी व्यक्तीगत संबंध असल्यानेच ही सर्व मंडळी येत असल्याची माहिती डॉ. बबनराव तायवाडे यांनी ' दै. पुढारी'शी बोलताना दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news