Ashneer Grover : ‘दोगला’ अशनीर ग्रोवर आणि त्याच्या कुटुंबीयांवर ‘FIR’ दाखल; 81 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; वाचा काय आहे प्रकरण

ashneer grower
ashneer grower
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Ashneer Grover : फिनटेक फर्म भारत पे चे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि दोगलापनचे लेखक अशनीर ग्रोवर आणि त्याच्या पत्नी माधुरी जैन यांच्यासह अन्य काही जणांवर EOW (आर्थिक गुन्हे शाखा) कडून FIR नोंदवण्यात आला आहे. दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांच्यावरही FIR दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कलम 409,420,467 आणि 120 B अशी एकूण 8 कलमं लागू केली आहे.

Ashneer Grover : अशनीर आणि त्याच्या पत्नीवर 81 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

अशनीर ग्रोवर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन यांच्यावर 81 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्यावर कथितपणे नकली invoice तयार करून भारत पे कंपनीच्या खात्यातून 81 कोटी रुपये आपल्या नातेवाइकांच्या खात्यात परस्पर वळवले आहेत.

दरम्यान, हा घोटाळा समोर आल्यानंतर जानेवारी 2022 पासून भारत पे कंपनीसोबत कायदेशीर लढाई सुरू आहे. अशनीर ग्रोवर (Ashneer Grover) हे भारत पे चे माजी व्यवस्थापकीय संचालक होते. तर त्यांची पत्नी माधुरी जैन जॉइंट डायरेक्टर ऑफ एच आर होत्या. त्यावेळी त्यांनी नकली इनव्हॉइस बनवून पैसे काढले होते. दोघांवर 81 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप ठेवण्यात आल्यानंतर अशनीर ग्रोवर यांना कंपनीने बरखास्त केले होते.

दिल्ली स्थित फिनटेक कंपनी भारत पे ने अशनीर ग्रोवर आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात दिल्ली पोलिसांच्या EOW आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. यामध्ये 81.28 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, कट रचणे तसेच पुरावे नष्ट करणे इत्यादी आरोप करण्यात आले होते.
त्याच महिन्यात भारत पे ने दिल्ली उच्च न्यायालयात दिवाणी न्यायालयात देखील याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये अश्नीर ग्रोवर (Ashneer Grover) आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात 88.67 कोटीपेक्षा अधिक वसूलीची मागणी करण्यात आली होती.

Ashneer Grover : भारत पे ने FIR चे केले स्वागत

भारत पे ने अश्नीर ग्रोवरवरील (Ashneer Grover) एफआयआरनंतर निवेदन जारी केले आहे. "आम्ही ग्रोवर, त्याची पत्नी माधुरी जैन आणि इतर कुटुंबातील सदस्यांविरुद्ध दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एफआयआर नोंदवण्याचे स्वागत करतो," असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच गेल्या 15 महिन्यांपासून ग्रोवरकडून (Ashneer Grover) कंपनी, तिचे बोर्ड आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात एक वाईट आणि दुर्भावनापूर्ण मोहीम चालवली जात आहे. एफआयआरनंतर तपास योग्य दिशेने होईल आणि या कुटुंबाने वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी विविध संशयास्पद व्यवहार कसे केले हे कळेल, असे ही या निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news