Aryan khan Drugs Case : आर्यन खानविरुद्ध अपराधजन्य पुरावे नाहीत : उच्च न्यायालय

Aryan khan Drugs Case : आर्यन खानविरुद्ध अपराधजन्य पुरावे नाहीत : उच्च न्यायालय

Aryan khan Drugs Case प्रकरणी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला जामीन मिळाला आहे. आता उच्च न्यायालायने दिलेल्या जामीन आदेशातील महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या आदेशात न्यायालायाने म्हटले आहे, की आर्यन खान याच्या विरुद्ध अपराधजन्या पुरावे नाहीत. आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडलेले नाही. तसेच आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मनुमुन धमेचा यांनी एकत्र येत बेकायदेशीर रित्या ड्रग्ज घेऊन गुन्हा करण्याची योजना आखली होती असे कोणतेही पुरावे आढळत नाही. यामुळे आर्यन खानला या केसमध्ये मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे.

Aryan khan Drugs Case न्यायालयाने आदेशात पुढे म्हटले आहे, फक्त क्रूझवर फिरण्याच्या आधारावर कोणावरही आरोप लावता येणार नाही. तसेच आर्यन खान याच्या व्हॉटसअप् चॅटमध्ये देखिल काही आक्षेपार्ह असे आढळलेले नाही. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट व मुनमुन धमेचा हे एकत्र होते असा कोणताही पुरावा नाही. तसेच मुनमुन धमेचा हिचा कडून जे ड्रग्ज मिळाले आहे ते विक्री करण्यात इतके नाही त्यामुळे या लोकांचा ड्रग्ज विक्रीची योजना होती अशी कोणतीही शक्यता वाटत नाही.

कोर्ट पुढे म्हणाले, एनसीबीने घेतलेल्या आरोपींच्या जबाबास आधार धरता येणार नाही नाही. तपास अधिकाऱ्यांसमोर आरोपींचे जबाब रेकॉर्ड करण्यात आले आहे त्याला ग्राह्य धरता येणार नाही. न्यायाधीश सांब्रे म्हणाले जर आरोपींवर जर गुन्हा सिद्ध जरी झाला तरी अधिका अधिक १ वर्षांची शिक्षा होऊ शकते. न्यायालायाने एनसीबीच्या कारवाईवर ताशेरे ओढत म्हणाले की, आरोपींचे आरोग्य तपासणी देखिल करण्यात आली नाही, जेणे करुन हे तरी समजले असते की त्यांनी ड्रग्ज घेतली आहे की नाही.

पुढे कोर्ट म्हणाले, की एनसीबीने असा कोणताही सकारात्मक पुरावा सादर केलेला नाही की ज्याच्या आधारे हे मानले जाईल की संशयित आरोपी आहेत. तसेच त्यांनी नियोजीत कटानुसार गुन्हा केलेला आहे. कोर्टाने दिलेल्या या जामीन आदेशानुसार हे स्पष्ट होते की, एनसीबीने कारवाईत अनेक ठिकाणी बेजबाबदारपणा केला आहे. कोठेही आर्यन हा गुन्हेगार आहे असे सिद्ध झाले नाही. त्यामुळे आर्यन खानसह त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मिळाला आहे. म्हणूनच आता या केस मध्ये आर्यनला मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news