Aryan Khan Drugs Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासंबंधी समीर वानखेडे यांची सीबीआयकडून आज पुन्हा चौकशी

Aryan Khan Drugs Case
Aryan Khan Drugs Case
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Aryan Khan Drugs Case : NCB मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना CBI ने आज पुन्हा क्रुझ प्रकरणी आर्यन खानच्या ड्रग्जच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणात सीबीआयने समीर वानखेडे यांची शनिवारी देखील तब्बल 6 तास चौकशी केली होती. दरम्यान, आजच्या चौकशीसाठी समीर वानखेडे हे सीबीआय कार्यालयाकडे निघाले आहेत. यावेळी वृत्तवाहिन्यांशी बोलताना म्हणाले, न्यायदेवतेवर विश्वास आहे. दरम्यान, समीर वानखेडे यांच्या निलंबनाची शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे.

आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची मागणी आणि भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता असे आरोप असलेल्या आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी शनिवारी तब्बल सहा तास कसून चौकशी केली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर शनिवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ते सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. आवश्यकता भासल्यास वानखेडे यांची पुन्हा करण्यात येण्याची शक्यता आहे. Aryan Khan Drugs Case

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणात अटक करणारे राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून सीबीआय तपास करत आहे. Aryan Khan Drugs Case

सीबीआयने वानखेडे यांच्यासह अन्य आरोपींच्या घर, कार्यालये, मालमत्तांवर छापेमारी केली होती. सीबीआयच्या पथकाने छापेमारीवेळी वानखेडेंची त्याच्या मुंबईतील घरी १३ तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. त्यानंतर वानखेडे यांना गुरुवारी चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, वानखेडे चौकशीला हजर राहिले नाहीत.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर शनिवारी सकाळी ते सीबीआयच्या वांद्रे- कुर्ला संकुलातील कार्यालयात हजर झाले. वानखेडे यांची सकाळच्या सत्रात साडे तीन तास कसून चौकशी करण्यात आली त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास जेवणासाठी त्यांना ३० मिनिटे सोडण्यात आले. दुपारी पुन्हा वानखेडे यांची दोन अडीच तास चौकशी करण्यात आली. दुपारी साडेचार वाजता ते सीबीआय कार्यालयातून बाहेर पडले.

Aryan Khan Drugs Case : काय आहेत समीर यांच्यावरील नेमके आरोप

आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात न गोवण्याच्या बदल्यात शाहरुख खानकडे २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप वानखेडे यांच्यासह अन्य आरोपींवर आहे. वानखेडे यांच्या सांगण्यावरून एनसीबीचा पंच किरण गोसावी याने २५ कोटींची खंडणी मागितली. वानखेडे यांनी किरण गोसावीला पैसे मागण्याची पूर्ण सूट दिली होती. त्यामुळेच गोसावी याने १८ कोटींमध्ये सौदा पक्का करत ५० लाख रुपये अॅडव्हान्सही घेतल्याचे समोर आले आहे.

आर्यन खानला अटक झाल्यानंतर त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेजच उपलब्ध नसून सीसीटीव्ही आणि डीव्हीआर करप्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे. सीसीटीव्हीची वायर उंदरांनी कुरतडल्याचे कारण एनसीबी कार्यालयाकडून देण्यात आल्याचे समजते.

आर्यन खानची चौकशी आणि अटकेदरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केली होती का, याचाही तपास समीर वानखेडेंच्या चौकशीत सीबीआय करत आहे.

Aryan Khan Drugs Case : वानखेडे यांच्या संपत्तीची चौकशी

वानखेडे यांच्या चौकशीसाठी दिल्लीतून देखील सीबीआयची एक टीम दाखल झाली आहे. वानखेडेंची प्रॉपर्टी, महागड्या गाड्या, घड्याळे आणि परदेश वाऱ्यांवरील खर्च यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती मिळते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news