‘ईडी’ समन्‍स नाकारल्‍यानंतर केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया, ” मला अटक …”

अरविंद केजरीवाल ( संग्रहित छायाचित्र)
अरविंद केजरीवाल ( संग्रहित छायाचित्र)

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्ली मद्य धोरणात कोणताही भ्रष्टाचार केला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचार करु नये म्‍हणून भाजपला मला अटक करायची आहे, असा आराेप दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (दि.४) व्हर्चुअल (आभासी) पत्रकार परिषदेत केला. दिल्‍ली मद्य घोटाळाप्रकरणी ईडीचे समन्‍स नाकारल्‍यानंतर प्रथम त्‍यांनी याबाबत आपली भूमिका स्‍पष्‍ट केली.

दिल्‍ली मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने बुधवारी केजरीवाल यांना तिसरे समन्‍स बजावले होते. हे समन्‍स नाकारल्‍यानंतर आज व्हर्चुअल (आभासी) पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल म्‍हणाले की, जर घोटाळा झाला असेल तर तो पैसा गेला कुठे, असा सवाल करत कोणताही भ्रष्टाचार केला नाही.आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचारात उतरु नये यासाठी भाजप मला अटक करणार आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

प्रामाणिकपणा माझी सर्वात मोठी ताकद

आम आदमी पार्टीच्‍या नेत्‍यांना एकामागून एक अटक केली जात आहे. भाजपला मलाही अटक करायची आहे. माझी सर्वात मोठी ताकद प्रामाणिकपणा आहे. त्यांचा उद्देश तपास करणे नसून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून त्यांना रोखणे हा आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

'ईडी'चे केजरीवालांना तिसर्‍यांदा समन्स

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात, ईडीने केजरीवाल यांना तिसऱ्यांदा समन्स पाठवत त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, केजरीवाल दिसले नाहीत. राज्यसभा निवडणूक आणि प्रजासत्ताक दिनाच्या तयारीत व्यस्त असल्याचे केजरीवालांनी म्‍हटले होते. यापूर्वी 'ईडी'ने केजरीवालांना 2 नोव्हेंबर आणि 21 डिसेंबर रोजी समन्‍स बजावले होते. दोन्ही समन्स बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्‍हणत त्‍यांनी ईडीसमोर हजर होण्यास नकार दिला. 21 डिसेंबरला समन्स मिळाल्यानंतर केजरीवाल 10 दिवसांच्या विपश्यनेसाठी पंजाबमधील होशियारपूर येथे गेले होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news