पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अटक असलेले अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी आज ( दि.२८ मार्च) संपली. त्यांना दुपारी २ वाजता दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या ईडी काेठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला की, "अरविंद केजरीवाल यांची तब्येत ठीक नाही, ते आजारी आहेत. 'ईडी'कडून त्यांचा छळ केला जात आहे."
सुनीता केजरीवाल म्हणाल्या की, 'ईडी'कडून दिल्लीचे मुख्यमंत्री व माझे पती अरविंद केजरीवाल यांना खूप त्रास दिला जात आहे. दिल्लीची जनता याचे उत्तर देईल.
याआधी बुधवार, २७ मार्च रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल दिल्ली आणि देशवासियांसाठी संदेश घेऊन मीडियासमोर आल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की, 'ईडी'च्या ताब्यात असतानाही केजरीवाल यांना दिल्लीतील लोकांची काळजी आहे. माझे शरीर तुरुंगात आहे, पण माझा आत्मा तुम्हा सर्वांमध्ये आहे, असा मुख्यमंत्र्यांचा संदेश आहे. अरविंद केजरीवाल यांना आहे. त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी अस्थिर आहे. तरीही त्याचा निर्धार पक्का आहे.
हेही वाचा :