Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपी ताब्यात

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन: दिल्लीचे मुख्यमंत्री, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी (दि.२०) रात्री उशिरा अज्ञाताकडून हा धमकीचा कॉल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांकडून तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मनोरुग्णाला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी जय प्रकाश दिल्लीतील मुंडका परिसरातील रहिवासी असून त्याच्यावर गुलाबी बाग परिसरात मानसोपचार सुरू आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटांनी पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅनला केजरीवाल यांच्यावर गोळ्या झाडण्याची धमकी देणारा फोन आला.
धमकीला पोलिसांनी गांभीर्याने घेत आरोपीचा शोध सुरू केला.अवघ्या काही तासांमध्येच आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांकडून जयप्रकाशचे सखोल चौकशी केली जात आहे. आरोपीने केलेल्या फोनच्या आधारे त्याचे लोकेशन ट्रेस करीत पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी दिल्ली गेट येथील एका 'आय सेंटर'मध्ये कामाला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news