पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची काल (दि.११) सायंकाळी ७ वाजता अंतरिम जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर आजपासून ते लोकसभा निवडणुक प्रचारात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी सहपत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासह कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात पूजा केली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित होते.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "हनुमानजींच्या आशीर्वादाने, करोडो लोकांच्या प्रार्थना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या न्यायाने तुम्हा सर्वांमध्ये परतताना मला खूप आनंद होत आहे".
हेही वाचा: