Aruna Miller : भारतीय वंशाच्या अरुणा मिलर यांनी इतिहास रचला! अमेरिकेतील मेरीलँडच्या बनल्या लेफ्टनंट गव्हर्नर

Aruna Miller
Aruna Miller
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय-अमेरिकन असलेल्या अरुणा मिलर (Aruna Miller) यांनी अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत बाजी मारली आहे. त्यांनी मेरीलँड राज्याच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदाची निवडणूक जिंकली आहे. त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आहेत. यामुळे पहिल्यांदाच भारतीय-अमेरिकन व्यक्ती मेरीलँडची लेफ्टनंट गव्हर्नर बनली आहे. तसेच अरुणा मिलर ह्या अमेरिकेत महत्त्वाच्या पदावर पोहोचलेल्या पहिल्या दक्षिण आशियाई महिला आहेत. अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीमध्ये मतदारांनी लेफ्टनंट गव्हर्नर, राज्य सचिव आणि इतर कार्यालयांचे प्रमुख निवडण्यासाठी मतदान केलं.

कोण  आहेत अरुणा मिलर (Aruna Miller)

57 वर्षीय अरुणा मिलर ह्या मुळच्या आंध्र प्रदेश राज्यातील आहेत. त्यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1964 रोजी झाला. आई-वडिलांसोबत त्या वयाच्या सातव्या वर्षी अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्यांनी १९८९ मध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी मिसूरी युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स ॲंड टेक्नॉलॉजीमधून (Missouri University of Science and Technology) घेतली. त्यांनी तब्बल २५ वर्षे मॉन्टगोमेरी काउंटीमधील स्थानिक वाहतूक विभागात काम केले आहे. त्यांचा विवाह डेव्हिड मिलर (David Miller) यांच्याशी झाला असून त्यांना तीन मुली आहेत. सध्या त्या मॉन्टगोमेरी काउंटीमध्ये वास्तव्यास आहेत.

Aruna Miller : राजकीय प्रवास 

रुणा मिलर (Aruna Miller) यांनी २०१० ते २०१८ या दरम्यान  मेरीलँड हाउस ऑफ डेलिगेट्समध्ये 15 जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2018 लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांना  डेमोक्रॅट्सच्या वतीनं राज्यपालपदासाठी उमेदवार बनवण्यात आले. राजकीय अभ्यासकांनी अंदाज वर्तवला होता की, 57 वर्षीय अरुणा मिलर या निवडणुकीत विजयी होतील आणि त्यासोबत मेरीलँडमध्ये या पदावर निवडून आलेल्या त्या पहिल्या भारतीय अमेरिकन बनतील. निकालानंतर अरुणा यांनी ट्विट करत  मतदारांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news