पुढारी ऑनलाईन: आता तुम्हाला लग्न, आरोग्य आणि सेवेशी संबंधित प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ज्योतिषांकडे जाण्याची गरज नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या रूपाने जगभरात चर्चा निर्माण करणाऱ्या ChatGPT ने आता ज्योतिषाच्या क्षेत्रातही प्रवेश केला आहे. एखाद्या व्यावसायिक ज्योतिषीप्रमाणे, हे AI तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरही देत आहे. याच्या मदतीने तुम्ही अनेक प्रकारचे प्रश्न विचारू शकता.
ChatGPT नंतर कंपनीने कुंडलीजीपीटी नावाचा वर चालणारा वैदिक ज्योतिषी चॅटबॉट विकसित केला आहे. एनआयटीचे माजी विद्यार्थी असलेल्या राज सुतारिया यांनी ही नाविन्यपूर्ण वेबसाइट विकसित केली आहे. जिथे कोणत्याही ग्राहकाच्या जन्मपत्रिकेची गणना करून, AI त्यांच्या जीवनाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देते. या चॅटबॉटवर तुमचा तपशील टाकल्यानंतर तुम्ही जीवनाशी संबंधित प्रश्न विचारू शकता. ही AI वर चालणारी वेबसाइट मशीन लर्निंग अल्गोरिदमद्वारे कुंडलीची गणना करते आणि ग्राहकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देते.
या वेबसाईटवरून माहिती घेण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील याबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. परंतु, भविष्यात यावर काही शुल्क आकारले जाऊ शकते. सध्या ही वेबसाइट मोफत माहिती देत आहे. भविष्यात कंपनी या वेबसाइटवर कुंडली दाखवण्यासाठी काही पैसे आकारू शकते.
हेही वाचा: