कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज (दि.४) सकाळी १० वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, तर प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, दै. पुढारीचे चेअरमन, समूह संपादक डॉ. योगेश जाधव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण, यांच्यासह इतर अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचलंत का ?