Army Day : लष्कर दिनाची परेड 1949 नंतर पहिल्यांदाच दिल्ली बाहेर, जाणून घ्या लष्कर दिनाचे महत्व

Army Day : लष्कर दिनाची परेड 1949 नंतर पहिल्यांदाच दिल्ली बाहेर, जाणून घ्या लष्कर दिनाचे महत्व
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : आज 15 जानेवारीला भारतीय लष्कराचा 75 वा लष्कर दिन (Army Day) असून यावर्षीची परेड पहिल्यांदाच दिल्ली बाहेर होत आहे. बंगळूरमधील एमईजी आणि सेंटर येथील परेड ग्राउंडवर ही परेड होणार आहे. 2023 पूर्वी पर्यंत लष्कर दिनाची परेड ही दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील करिअप्पा परेड ग्राउंडवर होत असे. मात्र, दिल्लीच्या बाहेर पहिल्यांदाच ही परेड होत असल्याने या वर्षीची परेड अनेक अंगाने लक्षवेधी ठरणार आहे.

लष्कर दिन केव्हापासून आणि का साजरा केला जातो? (Army Day)

भारतीय लष्कर हे स्वातंत्र्यापूर्वीपासून अस्तित्वात आहे. मात्र ते ब्रिटिशांच्या नेतृत्वात होते. आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचे जनरल के एम करिअप्पा यांनी 1949 मध्ये भारतीय लष्कराचे शेवटचे ब्रिटीश कमांडर इन चीफ जनरल सर फ्रान्सिस रॉबर्ट रॉय बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराची कमान स्वीकारली आणि भारताचे पहिले भारतीय लष्कर आणि लष्कर प्रमुख बनले. या प्रसंगाच्या स्मरणार्थ दरवर्षी 15 जानेवारीला लष्कर दिन साजरा केला जातो.

दिल्लीच्या कॅन्टोन्मेंटमधील करिअप्पा परेड ग्राउंडवर दरवर्षी 15 जानेवारीला लष्कर दिनानिमित्त परेड होत असत. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच ही परेड दिल्ली बाहेर बंगळूर येथे होणार आहे. समाजाशी सखोल संबंध जोडण्यासाठी भारतातील विविध फील्ड कमांडमध्ये ही परेड आयोजित केली जाईल, असे दक्षिण कमांडच्या स्टेशन कमांडरने सांगितले. यंदा हा उत्सव पुण्यात मुख्यालय असलेल्या सदर्न कमांडच्या देखरेखीखाली होत आहे. (Army Day)

आर्मी डे सायंकाळचा सोहळा शहरातील आर्मी सर्व्हिस कॉर्प्स (एएससी) सेंटर आणि कॉलेजमध्ये दुपारी 2:30 वाजता होणार आहे. राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे असतील. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे परेडचे पुनरावलोकन करतील आणि शौर्य पुरस्कार सादर करतील. त्यानंतर आर्मी सर्व्हिस कॉर्प्स (एएससी) टॉर्नेडोजचे साहसी मोटरसायकल प्रदर्शन, पॅराट्रूपर्सचे स्कायडायव्हिंग डिस्प्ले, डेअरडेव्हिल जंप आणि हेलिकॉप्टरचा फ्लाय पास्ट अशी थरारक प्रात्यक्षिके पाहता येणार आहे .(Army Day)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news