Arjun Kapoor : बॉयकॉट ट्रेंडवरून ट्रोलर्सनी अर्जुन कपूरलाही सुनावलं

अर्जुन कपूर
अर्जुन कपूर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड चित्रपटांना बॉयकॉट करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. मोठे-मोठे स्टार्सचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहेत. चित्रपट रिलीज होण्याआधीच सोशल मीडियावर लोक बायकॉटचा ट्रेंड करत आहेत. त्यामु‍ळे बडे-बडे बॉलीवूड स्टार्स (Arjun Kapoor ) यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. बॉयकॉट ट्रेंडवर आता अर्जुन कपूरने मौन साेडले आहे. पण, तो स्वत:च ट्रोल झाला आहे. (Arjun Kapoor )

बॉयकॉट ट्रेंडवर काय म्हणाला अर्जुन कपूर?

अर्जुन कपूरने बॉलीवूडच्या बॉयकॉटबाबत सध्या सुरू असलेल्या ट्रेंडवर नाराजी व्यक्त केली आहे. एक वेबसाईटशी बोलताना अर्जुन म्‍हणाला, "बॉयकॉट बॉलीवूड ट्रेंडचा जोरदार निषेध केला. यावर मौन धारण करून इंडस्ट्रीतील लोकांनी चूक केली आहे.  ही आमची शालीनता होती; पण लोकांनी त्याचा चुकीचा फायदा घेतला. मला वाटतं आता आपण खूप सहन केलंय आणि लोकांनी त्याची सवय करून घेतली आहे. आपण एकत्र येऊन याबद्दल काहीतरी केले पाहिजे, कारण जे लोक आपल्याबद्दल लिहितात आणि हॅशटॅग ट्रेंड होत आहेत त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. जेव्हा आपण एखादा चित्रपट करतो आणि तो बॉक्स ऑफिसवर चांगला चालतो, तेव्हा लोक आपल्याला आपल्या आडनावामुळे नव्हे तर आपल्या कामामुळे आवडतात. आता दुसरेचं काहीतरी घडू लागले आहे, हे अन्यायकारक आहे.".

अर्जुनवर ट्रोलर्स संतापले

अर्जुनच्या या वक्तव्यावर नेटकर्‍यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर लोक अर्जुनला सत्य सांगत आहेत. अर्जुनला ट्रोल करताना एका यूजरने त्याचे आतापर्यंतचे सर्व फ्लॉप चित्रपट मोजले आहेत. एका युजरने लिहिले – नेपो किड अर्जुन कपूरच्या करिअरमध्ये हिटपेक्षा जास्त फ्लॉप आहेत. अर्जुन कपूर जर नेपो किड नसता तर त्याला इतके चित्रपट मिळाले नसते.

अर्जुनला ट्रोल करताना एका युजरने लिहिले – तुझ्या चित्रपटांपेक्षा मलायका अरोराच्या बॉयफ्रेंडच्या नावानेच तुला ओळखले जाते. लोकांना धमकावण्याचा प्रयत्न करू नका. अर्जुन डिझास्टर फिल्म बनवत राहील, असेही युजरने लिहिले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news