Arbaaz -Shura Khan Wedding | अरबाज खान ५६ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर, शौरा खानशी बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

Arbaaz -Shura Khan
Arbaaz -Shura Khan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान वयाच्या ५६ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढलाय. त्याने काल २४ डिसेंबरला शौरा खान सोबत लग्न केले. त्याने स्वतः सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत याची घोषणा केली आहे. (Arbaaz -Shura Khan Wedding)

या जोडप्याने एका खासगी समारंभात लग्न केले. त्यांचे लग्न अरबाजची बहीण अर्पिता खान शर्माच्या मुंबईतील घरी पार पडले. यावेळी अरबाजचे भाऊ सलमान (Salman Khan) आणि सोहेल खान (Sohail Khan) तसेच त्याचे वडील सलीम आणि आई सलमा खान उपस्थित होते. या लग्न सोहळ्यावेळी अरबाजचा मुलगा अरहान देखील उपस्थित होता. अरबाजने शौरा सोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

फोटो शेअर करत अरबाजने म्हटले आहे की, "आमच्या प्रियजनांच्या उपस्थितीत, मी आणि माझे आयुष्यभराचे प्रेम आणि एकत्रतेची या दिवसापासून सुरुवात होत आहे! आमच्या या खास दिवशी तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हवे आहेत!".

अभिनेत्री मंजिरी फडणीस हिने अरबाजला शुभेच्छा देत लिहिले आहे की, "अभिनंदन. तुम्हा दोघांना खूप प्रेम." 'चेन्नई एक्स्प्रेस'मधील थंगाबली या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या निकितिन धीरनेही या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. (Arbaaz -Shura Khan Wedding)

कोण आहे शौरा खान?

अरबाज आणि शौरा यांची भेट 'पटना शुक्ला'च्या सेटवर झाली होती. अरबाजचे यापूर्वी मलायका अरोरा सोबत लग्न झाले होते. दोघांनी मार्च २०१६ मध्ये विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. त्यांनी लग्नाच्या १९ वर्षांनंतर ११ मे २०१७ रोजी अधिकृतपणे घटस्फोट घेतला. आता अरबाजने शौरा सोबत संसार थाटला आहे. शौरा एक बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट आहे आणि तिने रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानी यांच्यासोबत काम केले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news