सातव्या मुलीची सातवी मुलगी : अखेर रूपालीचं सत्य अद्वैतला समजणार! | पुढारी

सातव्या मुलीची सातवी मुलगी : अखेर रूपालीचं सत्य अद्वैतला समजणार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण जवळ आला आहे. कधी एकदा रूपालीचं सत्य अद्वैतला कळतंय, असं प्रेक्षकांना वाटत होतं. प्रेक्षकांची ही इच्छा २४ डिसेंबरच्या महाएपिसोडमध्ये पूर्ण होणार आहे. नेत्रा-इंद्राणीने जंगलात सर्पलिपीच्या अर्थाविषयी लपवून ठेवलेलं रहस्य रूपालीला नागामुळे कळतं. त्यात तिला कळतं की ती विरोचक आहे. त्याचबरोबर कलियुगात तिचा सेवक अद्वैतच्या रूपात वावरत आहे.

संबंधित बातम्या –

रूपालीला विरोचकाचं सत्य कळल्याचं नेत्रा-इंद्राणी आणि शेखरला आश्चर्य वाटतं. आता काहीही करून अद्वैतला जपायला हवं त्याचबरोबर रूपालीचं खरं रूप उघड होण्यासाठी योजना आखायला हवी, असं ते तिघे ठरवतात.

अद्वैत नेत्राला प्रश्न विचारतो की जर मी विरोचकाचा सेवक होतो, तर कलियुगात आता विरोचक कोण आहे. त्याचवेळी नेत्रा ठरवते की आता अद्वैतपासून सत्य लपवण्यात काहीच अर्थ नाही. योजना आखल्याप्रमाणे नेत्रा-इंद्राणी आणि शेखर, रूपालीला आपल्या जाळ्यात ओढतात. रूपालीला त्यांच्या योजनेचा पत्ता लागत नाही. त्यामुळे ती त्यांच्या जाळ्यात ओढली जाते. ज्यामुळे अद्वैतला रूपालीचं खरं रूप कळतं.

नेत्रा-इंद्राणी आणि शेखर नेमकी कोणती योजना आखतात? अद्वैतला रूपालीचं सत्य कसं समजणार? अद्वैत त्यावर विश्वास ठेवणार का तसेच विरोचक म्हणून रूपाली तिने केलेल्या गुन्ह्यांचं टोक गाठणार का? यासाठी पाहायला विसरू नका महारविवार २४ डिसेंबर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’.

Back to top button